जयपूर पिंक पँथर्सची तेलुगु टायटन्सवर ४ गुणांनी मात
By Admin | Updated: June 29, 2016 21:36 IST2016-06-29T21:36:34+5:302016-06-29T21:36:34+5:30
प्रो कबड्डी सीजन ४ च्या ८ व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने तेलुगु टायटन्सचा ४ गुणांनी पराभव केला. सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या या अटीतटीचा सामन्यात २८ - २४ गुणांनी तेलुगु टायटन्सला पराभव

जयपूर पिंक पँथर्सची तेलुगु टायटन्सवर ४ गुणांनी मात
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २९ : प्रो कबड्डी सीजन ४ च्या ८ व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने तेलुगु टायटन्सचा ४ गुणांनी पराभव केला. सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या या अटीतटीचा सामन्यात २८ - २४ गुणांनी तेलुगु टायटन्सला पराभव स्विकारावा लागला. उभय संघांमधला हा सामना अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत रंगला पण अंतिम क्षणांला जयपूरने आपला खेळ उंचावत सामना खिशात घातला.
जयपूर पिंक पँथर्स कडून शब्बीर बापू, राजेश नरवाल आणि कर्णधार जसवीर सिंह यांनी उत्तम पद्धतीने चढाया करत विजय खेचून आणला. राजेश नरवालने ८ गुणांची कमाई करत सामना एकहाती खिशात घातला. तेलुगु टायटन्सकडून विनोथ कुमार आणइ निलेश सालुंखे यानी एकतर्फी झुंज दिली. कर्णधार जसमेर सिंहचे प्रयत्न अपुरे पडले.