जैन स्पोर्ट्स अ संघाला विजेतेपद राज्य वरिष्ठ टेबल टेनिस स्पर्धा : विवेक आळवणी द्वितीय स्थानी
By Admin | Updated: December 1, 2015 23:35 IST2015-12-01T23:35:37+5:302015-12-01T23:35:37+5:30
जळगाव : मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गटातील टेबल टेनिस स्पर्धेत जैन स्पोर्टस् अ संघाने विजेतेपद पटकावले आहे. तर संघाचे खेळाडू विवेक आळवणी यांनी द्वितीय स्थान मिळवले.

जैन स्पोर्ट्स अ संघाला विजेतेपद राज्य वरिष्ठ टेबल टेनिस स्पर्धा : विवेक आळवणी द्वितीय स्थानी
ज गाव : मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गटातील टेबल टेनिस स्पर्धेत जैन स्पोर्टस् अ संघाने विजेतेपद पटकावले आहे. तर संघाचे खेळाडू विवेक आळवणी यांनी द्वितीय स्थान मिळवले.या स्पर्धेत राज्यभरातून ३२ संघ सहभागी झाले होते. नरीमन पॉईंट येथील पी.जे. हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीत जैन स्पोर्ट्स अ संघाने सोलापूर अ संघाचा ३-२ असा पराभव केला. विजयी जैन स्पोर्ट्सच्या संघात सुनील बाब्रस, उपेंद्र मुळे, विवेक आळवणी, नितीन मेंहदळे यांचा समावेश होता. यंदाच्या मोसमातील हे दुसरे सलग विजेतेपद आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक गटात विवेक आळवणी यांनी उपउपांत्य फेरीत गणेश मरकड यांचा ३ -१ असा पराभव केला, तर उपांत्य फेरीत मुंबईच्या हर्ष श्रॉफ यांचा ३ -० असा पराभव केला. अंतिम फेरीत सुनील बाब्रस यांच्याशी झालेल्या सामन्यात आळवणी यांना पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत आळवणी यांनी अंतिम फेरीपर्यंत एकही गेम गमावलेला नव्हता. या कामगिरीमुळे चंदीगड येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची राज्य संघात निवड निश्चित मानली जात आहे. जैन स्पोर्ट्स संघाला मिळालेल्या या यशाबद्दल जिल्हा मास्टर्स टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष अशोक जैन, सचिव फारूक शेख, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष अतुल जैन, मनोज अडवाणी, प्रकाश चौबे, चंद्रशेखर त्रिपाठी यांनी कौतुक केले.