जगजितचा अफलातून खेळ; भारत उपांत्य फेरीत

By Admin | Updated: July 2, 2015 02:57 IST2015-07-02T02:57:13+5:302015-07-02T02:57:13+5:30

ड्रॅगफ्लिकर जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने

Jagjit plays amazingly; India in semi-finals | जगजितचा अफलातून खेळ; भारत उपांत्य फेरीत

जगजितचा अफलातून खेळ; भारत उपांत्य फेरीत

एंटवर्प : ड्रॅगफ्लिकर जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत मलेशियाचा ३-२ गोलनी पराभव करून उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित तर केलीच; पण अझलान शाह हॉकी स्पर्धेतील पराभवाचा वचपासुद्धा काढला.
सतबीरसिंगने तिसऱ्या मिनिटाला गोल करून भारताला १-० गोलची आघाडी मिळून दिली होती. नंतर मलेशियाच्या राजिया रहिमने गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर २३व्या मिनिटाला त्यांच्या शाहारील सबाहने गोल करून मलेशियाला २-१ अशी आघाडी मिळून दिली. भारतीय आघाडीच्या फळीने अनेक व्यूहरचना रचून गोल करण्यापर्यंत प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिकर जगजितने गोल करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेचच भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळीसुद्धा जगजितने कोणतीही चूक न करता मलेशियाच्या गोलरक्षकाला चकवून आपल्या संघाचा तिसरा गोल केला. ही ३-२ गोलची आघाडी समना संपेपर्यंत राहिली. ८ एप्रिल रोजी अझलान शाह स्पर्धेत मलेशियाने भारताला ३-२ गोलनी नमविले होते. या विजयामुळे भारतीय संघाने त्या पराभवाचा वचपा काढला.

Web Title: Jagjit plays amazingly; India in semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.