जाडेजाला सामन्यातील मानधनाच्या पन्नास टक्के दंड
By Admin | Updated: October 10, 2016 19:04 IST2016-10-10T19:04:19+5:302016-10-10T19:04:19+5:30
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजावर इंदौर कसोटीत खेळपट्टीचं नुकसान केल्याप्रकरणी आयसीसीनं दंडाची कारवाई केली आहे.

जाडेजाला सामन्यातील मानधनाच्या पन्नास टक्के दंड
ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. १० : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजावर इंदौर कसोटीत खेळपट्टीचं नुकसान केल्याप्रकरणी आयसीसीनं दंडाची कारवाई केली आहे. भारताच्या पहिल्या डावात फलंदाजीच्या वेळी धाव घेताना जाडेजा जाणूनबुजून खेळपट्टीच्या मधोमध धावत होता.
जडेजाला पंचांनी वारंवाक ताकीद देऊनही तो सतत खेळपट्टीच्या मध्यभागावरुन धावात होता. त्याच्या वागणूकीत सुधारणा होतं नव्हती शेवटी पंचानी पेन्लटी न्यूझीलंडला पाच धावा बोनस म्हणून दिल्या. त्यामुळे एकही चेंडू न खेळता त्यांच्या खात्यावर पाच धावा होत्या.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यावर सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी क्रिकेट नियमावलीच्या कलम ७.२ नुसार जाडेजाला सामन्यातील मानधनाच्या पन्नास टक्के दंड ठोठावला आहे.