आयव्हरी कोस्टची जपानवर मात
By Admin | Updated: June 15, 2014 09:48 IST2014-06-15T09:48:06+5:302014-06-15T09:48:39+5:30
फिफा वर्ल्डकपमध्ये आयव्हरी कोस्टने जपानवर २- १ अशी मात करत फिफा वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला.

आयव्हरी कोस्टची जपानवर मात
ऑनलाइन टीम
दि. १५, रेसिफ(ब्राझील) - सामन्याच्या पहिल्या हाफमधील पिछाडीनंतरही आयव्हरी कोस्टने जपानवर २- १ अशी मात करत फिफा वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला.
फिफा वर्ल्डकपमध्ये क गटात शनिवारी रात्री रेसिफे जंग येथील स्टेडियमवर आयव्हरी कोस्टविरुध्द जपान यांच्यात सामना पार पडला. जपानने सामन्याच्या सोळाव्या मिनीटालाच गोल मारुन सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जपानच्यावतीने किसूकी होंडाने हा गोल मारला होता. यानंतर जपानच्या बचावफळीने चमकदार खेळ करत पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत आयव्हरी कोस्टचा खेळाडूंना गोल करु दिला नाही.
मध्यंतरानंतर मात्र चित्रच बदलले. आयव्हरी कोस्टच्या डिडीयार ड्रोग्बा आणि विलफ्रेंड बॉनी या खेळाडूंनी अनुक्रमे ६२ आणि ६२ व्या मिनीटाला गोल मारुन आयव्हरी कोस्टला विजयी आघाडी मिळवून दिली.
दरम्यान, याच गटात शनिवारी रात्री ग्रीस विरुद्ध कोलंबिया सामना पार पडला. कोलंबियाने अनेक वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली. कोलंबियाने ग्रीसला ३-० ने धूळ चारली.