धोनीने वन-डेचे कप्तानपद सोडण्याची वेळ आली - इयान चॅपेल
By Admin | Updated: January 24, 2016 16:18 IST2016-01-24T16:16:01+5:302016-01-24T16:18:20+5:30
महेंद्रसिंग धोनीचा वन-डे कर्णधारपदाचा काळ आता संपला असून त्याने हे पद सोडण्याची वेळ आली आहे' असे मत इयान चॅपेल यांनी व्यक्त केले.

धोनीने वन-डेचे कप्तानपद सोडण्याची वेळ आली - इयान चॅपेल
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २४ - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय खेळाडूंवर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी तर 'महेंद्रसिंग धोनीचा वन-डे कर्णधारपदाचा काळ आता संपला असून त्याने हे पद सोडण्याची वेळ आली आहे' असे मत व्यक्त केले आहे. ' निर्धारित षटकांच्या खेळात धोनीने जास्तकाळ कर्णधारपद भूषवले असून त्याचा भारतीय टीमवर विपरीत प्रभाव पडत आहे' असे चॅपेल यांनी एका कॉलममध्ये म्हटले आहे.
' एखाद्या कर्णधाराचा संघावर काही विशिष्ट काळासाठी प्रभाव असतो, मात्र त्यानंतर त्यांच्यामुळे संघाचे नुकसान होते व कामगिरीही बिघडते. धोनीने आता कर्णधारपद सोडून संघाला आणखी होणाऱ्या नुकसाननापासून वाचवावे. सध्याचा भारतीय संघ खराब कामगिरी करत आहे. त्यांना नवीन कल्पनांची व रणनीतीची गरज आहे' असे चॅपेल यांनी आपल्या कॉलममध्ये नमूद केले आहे. ' जर प्रतिस्पर्धी संघ चार एकदिवसीय सामन्यांमध्ये १३०० पेक्षा अधिक करत असेल तर त्यासाठी फक्त सपाट खेळपट्टी आणि गोलंदाजांनाच जबाबादार ठरवणे योग्य नाही, त्यापुढे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. यशस्वी कर्णधाराला सतत संधी देणे ही आपली मानसिकता असली तरी संघाची सध्याची कामगिरी कशी आहे. यावरही त्याची योग्यता जोखली पाहिजे' असेही चॅपेल यांनी म्हटले आहे.