शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Big News : सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत यांचे टोक्यो ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:36 IST

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ( Saina Nehwal ) आणि किदम्बी श्रीकांत ( Kidambi Srikanth ) यांचे यंदा होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympics) खेळण्याचे स्वप्न अखेर तुटले.

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ( Saina Nehwal ) आणि किदम्बी श्रीकांत ( Kidambi Srikanth ) यांचे यंदा होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympics) खेळण्याचे स्वप्न अखेर तुटले. जागतिक बॅडमिंटन फेडरेशननं ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठीची डेडलाईन १५ जूनला संपणार असल्याचे जाहीर केले आणि या डेडलाईनपर्यंत एकही पात्रता स्पर्धा होणारी नाही. त्यामुळे सायना व श्रीकांत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाचे सदस्य नसतील. शिवाय सध्याच्या बॅटमिंटन क्रमवारीतही कोणताच बदल होणार नसल्यानं सायना व श्रीकांतसाठीची अखेरची आशाही मावळली आहे. सिंगापूर येथे होणारी अखेरची पात्रता स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. ( Saina Nehwal and Kidambi Srikanth out of reckoning for Tokyo Olympics)  जागतिक बॅडमिंटन फेडरेशननं सांगितले की,''टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची डेडलाईन १५ जून २०२१ला संपत आहे. रेस टू टोक्यो रँकिंगमध्ये कोणताच बदल होणार नाही. कोरोना संकटामुळे तीन महत्त्वाच्या स्पर्धा रद्द झाल्यानंतर फेडरेशननं पात्रतेसाठी कालावधी दोन महिन्यांनी वाढवला होता.''   

कोरोना व्हायरसमुळे इंडिया ओपन, मलेशिया ओपन आणि सिंगापूर ओपन या स्पर्धा रद्द झाल्या. त्यामुळे सायना व श्रीकांतचे ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याचे स्वप्न भंगले. सायना क्रमवारीत २२व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना जागतिक क्रमवारीत अव्वल १६ मध्ये असणे गरजेचे आहे. पण, आता १५ जूनपर्यंत स्पर्धाच नसल्यानं यात बदल होईल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताकडून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी व्ही सिंधू आणि साई प्रणित यांचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित झाला आहे.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Saina Nehwalसायना नेहवाल