इटली संघाचा बेल्जियमवर विजय
By Admin | Updated: June 14, 2016 05:08 IST2016-06-14T02:21:21+5:302016-06-14T05:08:55+5:30
सामन्याच्या सुरुवातीपासून इटलीच्या संघाने आपला दबदबा ठेवत बेल्जियमवर २-० अशी मात करत युरो चषकाच्या सामन्यात विजय मिळविला.

इटली संघाचा बेल्जियमवर विजय
ऑनलाइन लोकमत
फ्रान्स, दि. १४ - सामन्याच्या सुरुवातीपासून इटलीच्या संघाने आपला दबदबा ठेवत बेल्जियमवर २-० अशी मात करत युरो चषकाच्या सामन्यात विजय मिळविला.
या सामन्यात सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत इटलीने बेल्जियमवर आपला दबदवा कायम ठेवला. खेळातील ३२ व्या मिनिटाला इटलीच्या इमॅन्युएल जिआचेरिनी याने पहिला गोल केला. त्यानंतर, सामन्याच्या ९० मिनिटानंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त तीन मिनिटापैकी दुस-या मिनिटाला पेलेने एक गोल करून इटलीला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
युरो चषकाच्या स्पर्धेतील ग्रुप 'ई'मध्ये बेल्जियम, इटली, रिपब्लिक ऑफ आयर्लंड आणि स्वीडन हे बलाढ्य संघ आमनेसामने आहेत. त्यामुळे हा गट युरो चषकातला ग्रुप ऑफ डेथ समजला जाणार आहे..