मोक्याच्या क्षणी नांगी टाकणे महागडे ठरले!
By Admin | Updated: December 3, 2015 03:23 IST2015-12-03T03:23:30+5:302015-12-03T03:23:30+5:30
जीवनात मनाविरुद्ध घडण्याचे अनेक प्रसंग येतात. अशावेळी आम्ही काही वेगळे करीत आहोत का, असा प्रश्न स्वत:ला विचारावाच लागतो. माझ्यासाठी आणि द. आफ्रिकेसाठी सध्याची

मोक्याच्या क्षणी नांगी टाकणे महागडे ठरले!
- एबी डिव्हिलियर्स लिहितो...
जीवनात मनाविरुद्ध घडण्याचे अनेक प्रसंग येतात. अशावेळी आम्ही काही वेगळे करीत आहोत का, असा प्रश्न स्वत:ला विचारावाच लागतो. माझ्यासाठी आणि द. आफ्रिकेसाठी सध्याची स्थिती अशीच आहे. मोहाली आणि नागपूरमध्ये पराभव झाल्याने मालिकेत आम्ही ०-२ ने माघारलो. याबद्दल घोर निराशा झाली. टी-२० आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर कसोटीतही बाजी मारू अशीच अपेक्षा होती. पण असे घडू न शकल्याने आमच्या आशेवर पाणी फेरले गेले.
खेळपट्टीला दोष देण्यात अर्थ नाही. टर्निंग विकेट बनविणे मुद्दा नाही. खेळपट्टी उभय संघांसाठी एकसारखीच होती. यावर काही बोलणार नाही. दोष आमचाच आहे. विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी
केली. ते विजयाचे हकदार आहेत. आमच्याबाबतीत बोलायचे झाल्यास संघाला मोहाली आणि नागपुरात खेळावर नियंत्रण ठेवण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी नांगी टाकल्याने संधी घालवली. सत्य असे की नागपूरची खेळपट्टी फलंदनाजांसाठी आव्हान होती. दोन्ही संघातील फलंदाजांपैकी सर्वोच्च खेळी येथे ४० धावांची ठरली. माझ्या मतांना हा दुजोरा ठरावा. परिस्थितीशी ताळमेळ साधण्यात भारतीय संघाला यश आले व त्यांनी विजय मिळविला.
दिल्लीचा सामना आम्हाला निराशेतून बाहेर पडण्यास आणि खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोक्याचा ठरू शकतो. भारतात कसोटी जिंकू शकतो तसेच घालविलेली पत परत मिळविण्यासाठी दिल्लीचा विजय दिलासा देणारा असेल. यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची असल्याने भारतावरील विजय आत्मविश्वास कायम करणारा ठरावा. आम्हाला सुधारण्यास वाव आहे आणि आम्ही खेळात सुधारणा करणार हे निश्चित.(टीसीएम)