वेस्ट इंडीजबाबत भाष्य करणे कठीण

By Admin | Updated: February 10, 2015 02:04 IST2015-02-10T02:04:54+5:302015-02-10T02:04:54+5:30

जर भावना व आनंद मिळणे याचा विचार केला तर जगातील प्रत्येकाने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला दुसरे स्थान दिले असते.

It is difficult to comment about the West Indies | वेस्ट इंडीजबाबत भाष्य करणे कठीण

वेस्ट इंडीजबाबत भाष्य करणे कठीण


जर भावना व आनंद मिळणे याचा विचार केला तर जगातील प्रत्येकाने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला दुसरे स्थान दिले असते. या संघाचा सुवर्णकाळ हा आता इतिहास झाला आहे. त्यांचा निराशाजनक कालखंड किमान दोन पिढ्यांपासून सुरू आहे. त्यानंतरही विंडीज संघाने चमकदार कामगिरी करावी, अशी आपली इच्छा असते. कामगिरी कशीही झाली तरी विंडीज संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यांवरील हास्य मात्र कायम असते, त्यामुळे कदाचित चाहत्यांची भावना तशी असावी. विंडीज संघाचा इतिहास चमत्कारिक आहे, तर वर्तमान स्थिती नाजूक आहे.
२० षटकांच्या खेळामध्ये वेस्ट इंडिज संघ विस्फोटक असल्याचे दिसून येतो. २० षटकांच्या खेळात हा संघ कुठल्याही संघापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहे. पण, यात काही षटकांची भर पडली तर प्रत्येक षटकासोबत संघापुढील आव्हानांमध्ये भर पडत जाते. विश्वकप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाच्या मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? याचे उत्तर शोधण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. प्रतिभावान सॅम्युअल्स की ख्रिस गेल. गेल टी-२० क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाज असल्याचे दिसून येते. ५० षटकांच्या खेळात गेल ‘लॉटरी’प्रमाणे भासतो. विंडीज संघाला प्रतिस्पर्धी संघापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी गेलला आपल्या आक्रमक फलंदाजीच्या व्याख्येमध्ये बदल करावा लागणार आहे. गेल व सॅम्युअल्स यांना ड्वेन ब्राव्हो, पोलार्ड, सॅमी आणि रसेल यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात यश आले तर हा संघ धोकादायक ठरू शकतो; पण पोलार्ड व ब्राव्हो यांचा संघात समावेश नाही आणि त्याचे कारणही कळलेले नाही. त्यामुळे सॅमी व रसेल यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. ही जबाबदारी पेलणे त्यांच्यासाठी सोपे नाही.
केमार रोच, जेरोम टेलर आणि उदयोन्मुख शेल्डन कोटरेल यांचा समावेश असलेल्या विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू समतोल भासते; पण भेदक आहे असे म्हणता येणार नाही. कर्णधार जेसन होल्डरला गोलंदाज म्हणून अद्याप छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. कर्णधार स्वत:च संघात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संघातील अन्य खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करू शकत नाही. विंडीज संघ विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्यात यशस्वी ठरला तर आश्चर्य वाटेल. कमकुवत गोलंदाजी आक्रमण असलेल्या संघाविरुद्ध वेस्ट इंडिज
संघ लक्ष्य गाठण्यात यशस्वी
ठरेल; पण याची हमी देता येणार
नाही. (टीसीएम)

Web Title: It is difficult to comment about the West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.