सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद
By Admin | Updated: June 12, 2017 14:54 IST2017-06-12T14:11:49+5:302017-06-12T14:54:09+5:30
काही काही माणसांना मुद्दामहून वाद उकरून काढण्याची सवय असते. कोणत्याही मार्गाने वाद निर्माण करून चर्चेत राहिल्याशिवाय अशा मंडळींना

सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - काही काही माणसांना मुद्दामहून वाद उकरून काढण्याची सवय असते. कोणत्याही मार्गाने वाद निर्माण करून चर्चेत राहिल्याशिवाय अशा मंडळींना चैन पडत नाही. अशाच उठसूट वाद निर्माण करणाऱ्यांपैकी एक म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक रामगोपाल वर्मा. कधी प्रक्षोभक वक्तव्य, कधी आक्षेपार्ह लेखन करून तो सतत वाद ओढवून घेत असतो. आता रामून भारताची टेनिस सुंदरी सानिया मिर्झाचा एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून नव्या वादाला फोडणी दिली आहे.
रामूने सानियाचा टेनिस खेळत असतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सामन्यादरम्यान फटका खेळत असलेल्या सानियाचे अंतर्वस्त्र दिसत आहे. या छायाचित्राला दिलेल्या कॅप्शनमध्ये रामू म्हणतो, "कुण्या एका तरुणीने सांगितले की माझ्या मुलीला सनी लियोनी बनायचे आहे. त्यावरून मला एक गोष्ट आठवली. एक मुलगी टेनिस खूप चांगले खेळायची, पण हा खेळ खेळण्यासाठी स्कर्ट्स घालावा लागत असल्याने वयात आल्यावर तिच्या वडलांनी तिला खेळण्यास मनाई केली.
या छायाचित्रामधून रामूला नेमके काय सांगायचे होते ते कुणालाच कळले नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही त्याची सोशल मीडियावर धुलाई झाली. पण अशा टीकेमुळे रामूला काही फरक पडण्याची चिन्हे नाहीत. कारण त्याला अशा टीकेची आता सवय झालीय.