इस्रायली पंचाचा चेंडू लागून मृत्यू
By Admin | Updated: December 1, 2014 03:05 IST2014-12-01T03:05:59+5:302014-12-01T03:05:59+5:30
उसळता चेंडू आदळल्याने आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच क्रिकेटविश्वाला आणखी एक धक्का बसला आहे

इस्रायली पंचाचा चेंडू लागून मृत्यू
जेरूसलेम : उसळता चेंडू आदळल्याने आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच क्रिकेटविश्वाला आणखी एक धक्का बसला आहे. इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि पंच हिलेल अवासकर यांचा रविवारी सामन्यादरम्यान चेंडू लागून मृत्यू झाला.
लीग सामन्यादरम्यान फलंदाजाने मारलेला चेंडू यष्टीवर आदळून अवासकर यांच्या मानेला लागला. गंभीर अवस्थेत अवासकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित केले. चेंडू लागल्यावर अवासकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ५५वर्षीय अवासकर यांनी १९८२पासून आयसीसीच्या पाच स्पर्धांमध्ये इस्रायलचे नेतृत्व संभाळले होते.