शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

आयएसएलने स्पर्धात्मक वातावरण दिले!

By admin | Updated: December 4, 2014 01:51 IST

भारतीय फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी गेल्या आठवड्यात मला जो हॉफ आॅफ फेम मिळाला तो मी माझा मोठा बहुमान मानतो

भारतीय फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी गेल्या आठवड्यात मला जो हॉफ आॅफ फेम मिळाला तो मी माझा मोठा बहुमान मानतो. आशियाई किंवा भारतीय वंशाच्या माणसाला मिळालेला हा सन्मान निश्चितच मोठा आहे. भारतासाठी खेळण्याचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे मला भाग्य लाभले. माझ्या परिश्रमाचे चीज झाले. यामुळे मोठ्या लोकांच्या पंक्तित जाऊन बसलो याचाही आनंद आहे.विदेशात मी बरी एफसीकडून खेळण्याचा अनुभव घेतला. माझ्या कारकीर्दीत आयएसएल असती तर बरे वाटले असते. मोठे खेळडू आणि मान्यवर प्रशिक्षकांसोबत खेळण्याचा आनंद विरळाच. आव्हानात्मक कामगिरी आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळावे यासाठी खेळाडू परदेशात जातात. उत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध किंवा सोबत खेळून तुम्ही स्वत:चा दर्जा सुधारू शकता. हिरो आयएसएलमुळे भारतीयांना ती संधी उपलब्ध झाली ती देखील भारतात! चांगल्या खेळाडूंना सुधारायची यामुळे संधी मिळेल आणि परिस्थितीत बदल घडून येईल.तरुण खेळडूंना आणखी संधी हवी, या नॉर्थ ईस्ट युनायटेडचा प्रशिक्षक रिकी हर्बर्ट याच्या मताशी मी सहमत आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेड तरुण पण अनुभवहीन संघ आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेडचे मोठे खेळाडू विविध संघांकडून खेळताना दिसतात पण गुणवत्ता असूनही अनुभव नसल्याने यंदा त्यांना फारशी चमक दाखविता आली नाही. या स्पर्धेत अ‍ॅटलिटिको डी कोलकाता आणि चेन्नईयन हे माझे फेव्हरिट आहेत पण गोव्याला कमी लेखता येणार नाही. या संघाने दमदार पुनरागमन केले. चेन्नई तगडा संघ आहे पण माझ्या भाकीतानुसार एलिनोसारख्या खेळाडूची दुखापत उपांत्य लढतीसाठी महागडी ठरू शकते. कोलकाताची घसरण झाली तरी उपांत्य फेरीसाठी हा संघ माझ्या मताप्रमाणे दावेदार असेल. बाद फेरीचे दडपण खेळाडूंवर असल्याचे हबासने कबूल केले. खरेतर असे घडायला नको. (टीसीएम)