अनफिट इशांत शर्मा वर्ल्डकपमधून 'आऊट'
By Admin | Updated: February 7, 2015 14:14 IST2015-02-07T14:12:06+5:302015-02-07T14:14:12+5:30
गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला इशांत शर्मा विश्वचषकामधून 'आऊट' झाला आहे.

अनफिट इशांत शर्मा वर्ल्डकपमधून 'आऊट'
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, ७ - गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला इशांत शर्मा विश्वचषकामधून 'आऊट' झाला आहे. दुखापतग्रस्त इशांत शर्मा डिसेंबर पासून एकही सामना खेळू शकलेला नाही. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम १५ जणांच्या संघात त्याला स्थान देण्यात आले होते. मात्र आज झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो अनफिट ठरल्याने त्याला स्पर्धेत खेळता येणार नाही.
दरम्यान आता इशांतऐवजी मोहित शर्माला संघात स्थान मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.