शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

आयर्लंडचा दे धक्का, वेस्ट इंडिजचा केला पराभव

By admin | Updated: February 16, 2015 12:58 IST

वर्ल्डकपमध्ये जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणा-या आयर्लंडने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नेल्सन, दि. १६ - वर्ल्डकपमध्ये जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणा-या आयर्लंडने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. आयर्लंडने वेस्ट इंडिजचा चार गडी राखून पराभव केला असून आयर्लंडने ३०५ धावांचे लक्ष्य ४५.५ षटकांमध्येच गाठले.  

वर्ल्डकपमध्ये सोमवारी वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात सामना पार पडला. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  वेस्ट इंडिजचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्याने वेस्ट इंडिजची अवस्था ५ बाद ८७ अशी झाली होती. यानंतर लेंडल सिमन्स (१०२ धावा) आणि डॅरेन सॅमीने (८९ धावा) या जोडीने वेस्ट इंडिजचा डाव फक्त सावरलाच नाही तर संघाला तीनशेचा टप्पाही गाठून दिला. त्यांना अँड्रे रसेलने नाबाद २८ धावांची खेळी करुन मोलाची साथ दिली. खराब सुरुवातीनंतरही वेस्ट इंडिजने ५० षटकांत सात गडी गमावून ३०४ धावा केल्या. 
वेस्ट इंडिजने दिलेले ३०५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडने चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या विकेटसाठी आयर्लंडचा कर्णधार विल्यम पोर्टफिल्ड आणि पॉल स्टर्लिंग यांनी संयमी खेळी करत संघाला अर्धशतकी सलामी दिली. आयर्लंडच्या ७१ धावा झाल्या असताना पोर्टफिल्ड बाद झाला. यानंतर स्टर्लिंग व एड जॉयस (८४ धावा) या जोडीने शतकी भागीदारी केली. स्टर्लिंगचे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले. ९२ धावांवर असताना स्टर्लिंग सॅम्यूअल्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जॉयस व नील ओब्रायनने धडाकेबाज खेळी करत यंदाच्या वर्ल्डकपमध्ये संघाला पहिला विजय मिळवून दिला. ओब्रायनने नाबाद ७९ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजने दिलेले ३०५ धावांचे लक्ष्य आयर्लंडने चार गडी आणि ४ षटकं शिल्लक  असतानाच गाठले. 
आयर्लंड संघ हा वर्ल्डकपमध्ये जायंट किलर म्हणून प्रसिद्ध असून सोमवारीही याचाच अनुभव आला. वेस्ट इंडिजच्या निष्प्रभ मा-याचा आयर्लंडने खरपूस समाचार घेत दिमाखदार विजय मिळवला. २०११ मध्ये आयर्लंडने इग्लंडचा तर त्यापूर्वीच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.