आयर्लंड विरुद्ध द. आफ्रिकेने उभारला ४११ धावांचा डोंगर

By Admin | Updated: March 3, 2015 12:52 IST2015-03-03T12:52:33+5:302015-03-03T12:52:33+5:30

मनुका ओव्हल येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल ४११ धावांचा डोंगर उभारला असल्याने आयरीश फलंदाजांपुढे मोठे आव्हान आहे.

Ireland v. D. 411 runs raised by South Africa | आयर्लंड विरुद्ध द. आफ्रिकेने उभारला ४११ धावांचा डोंगर

आयर्लंड विरुद्ध द. आफ्रिकेने उभारला ४११ धावांचा डोंगर

>ऑनलाइन लोकमत
कॅनबेरा, दि. ३ - मनुका ओव्हल येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल ४११  धावांचा डोंगर उभारला असल्याने आयरीश फलंदाजांपुढे मोठे आव्हान आहे.
नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १६ चौकार व चार षटकार मारत १२८ चेंडूत हाशिम आमलाने एकट्याने १५९ धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांनी चिकाटीने फलंदाजी केली. क्विन्टन डि कॉक फक्त एक धाव करत तंबूत परतला असता हाशिम आमला व डु प्लेसीस या जोडगोळीने दक्षिण आफ्रिका संघाने कधीही विश्वचषकात न केलेली भागिदारी या सामन्यात केली आहे. डु प्लेसीसने १०९ चेंडूत १०९ धावा करत आमला पाठोपाठ शतकपूर्ती केली. तसेच कर्णधार अब्राहम डि व्हिलिअर्स अँडी मॅकब्रायनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत असतानाओब्रायनकडे झेल गेल्याने २४ धावांवर बाद झाला. डेव्हिड मिलर व रिले रुसो हे दोघे फलंदाज नाबाद राहिले असून मिलरच्या ४६ धावा झाल्या असून रुसोने ६१ धावा केल्या आहेत. 

Web Title: Ireland v. D. 411 runs raised by South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.