मुनीवरील टीकेमुळे आयर्लंड नाराज
By Admin | Updated: March 12, 2015 00:31 IST2015-03-12T00:31:22+5:302015-03-12T00:31:22+5:30
झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाने एका वर्तमानपत्रात आलेल्या त्या लेखाविषयी नाराजी जाहीर केली आहे. या वर्तमानपत्रात आयरिश अष्टपैलू

मुनीवरील टीकेमुळे आयर्लंड नाराज
सिडनी : झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाने एका वर्तमानपत्रात आलेल्या त्या लेखाविषयी नाराजी जाहीर केली आहे. या वर्तमानपत्रात आयरिश अष्टपैलू खेळाडू जॉन मुनीवर वैयक्तिक टीका केली होती. मुनीने होबार्ट येथे शनिवारी सीमारेषेवर झेल घेऊन झिम्बाब्वेच्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशेला तिलांजली दिली होती.
तथापि, ‘झिम्बाब्वे हेरॉल्ड’ने ‘दारुड्याने झिम्बाब्वेला केले विश्वचषकाबाहेर’ असे मुनीवर वैयक्तिक टीका करणारे शीर्षक दिले होते. मुनी याआधी मद्याच्या सवयीमुळे त्रस्त होता. त्यामुळे गत वर्षी तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाऊ शकला
नव्हता. याविषयी झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रँडन टेलरने बुधवारी मुनीची माफी मागितली. त्याने टिष्ट्वट केले, ‘झिम्बाब्वे क्रिकेट संघातर्फे आम्ही आयर्लंड क्रिकेट आणि जॉन मुनीविषयीच्या ‘त्या’ लेखाविषयी माफी मागतो.’
क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी वॉरेन ड्यूटरोम यांनीदेखील या वृत्तावर टीका केली आणि या कृतीचे वर्णन बालिशपणा असे केले होते. (वृत्तसंस्था)