आयपीएल फिक्सिंग प्रकरण सुनावणी 14 नोव्हेंबर्पयत पुढे ढकलली

By Admin | Updated: November 10, 2014 23:46 IST2014-11-10T23:46:57+5:302014-11-10T23:46:57+5:30

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आयपीएलच्या सहाव्या पर्वातील फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी 14 नोव्हेंबर्पयत पुढे ढकलली आहे.

The IPL fixing case was postponed till November 14 | आयपीएल फिक्सिंग प्रकरण सुनावणी 14 नोव्हेंबर्पयत पुढे ढकलली

आयपीएल फिक्सिंग प्रकरण सुनावणी 14 नोव्हेंबर्पयत पुढे ढकलली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आयपीएलच्या सहाव्या पर्वातील फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी 14 नोव्हेंबर्पयत पुढे ढकलली आहे. 
प्रकरणाची चौकशी करीत असलेले माजी न्यायमूर्ती मुकुल मुद्गल यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या समितीने चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. आयपीएल प्रकरणाची चौकशी करत असलेल्या दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी न्यायमूर्ती टी. एस. ठाकरू व न्यायमूर्ती फकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला यांच्या विशेष खंडपीठाने सांगितले की, अद्याप या अहवालाचा अभ्यास केलेला नसून, या प्रकरणाची सुनावणी 14 नोव्हेंबर्पयत पुढे ढकलण्यात आली आहे. 
याचिका दाखल करणारे बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की,‘मुद्गल समितीच्या पहिल्या अहवालामध्ये हे स्पष्ट झाले की, एन. श्रीनिवासन त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन हे चेन्नई सुपरकिंग्ज संघ चालवितात ही बाब उघड 
करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे श्रीनिवासन यांना पुन्हा बीसीसीआयची निवडणूक लढण्याची परवानगी मिळायला नको. न्यायालयाची परवानगी असेल तरी ही बाब सार्वजनिक होण्यास कुठलीच हरकत नसावी.’
त्याआधी, आयपीएलच्या सहाव्या पर्वातील फिक्सिंग व भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीबाबत न्यायालयामध्ये टेन्स वातावरण होते. समितीचे वकील राजू रामचंद्रन यांनी न्यायालयात सांगितले की, 3क् पानांचा चौकशी अहवाल सीलबंद लिफाफ्यामध्ये असून कुठल्या व्यक्तीचे नाव देण्यापेक्षा कोड नंबरचा वापर करण्यात आलेला आहे. त्याव्यतिरिक्त साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारावर वेगळा चौकशी अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालामध्ये वेगळा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: The IPL fixing case was postponed till November 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.