आयपीएल डायरी
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30
हा विजय आमच्यासाठी सकारात्मक : गंभीर

आयपीएल डायरी
ह विजय आमच्यासाठी सकारात्मक : गंभीरपुणे : रायजिंग पुणे सुपर जायंटस्विरुद्ध रोमहर्षक सामन्यात २ गडी राखून विजय मिळवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने हा विजय खूप महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक असल्याचे सांगितले. गंभीरने सामनावीर ठरलेल्या सूर्यकुमारची प्रशंसा केली. सूर्यकुमारने ज्याप्रमाणे फलंदाजी केली ती अविश्वसनीय होती. मनीष पांडे संघात नसणे खूप मोठा धक्का होता; परंतु सूर्यकुमारमुळे आम्हाला अनेक पर्याय उपलब्ध झाले. युसूफ पठाणनेही चांगली कामगिरी केली, असे गंभीरने म्हटले. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. अखेरच्या तीन-चार षटकांत खूप धावा खर्च केल्या. आम्हाला आणखी कठोर होण्याची आवश्यकता होती, असे गंभीर म्हणाला.कर्णधाराच्या अपेक्षेला उतरलो : सूर्यकुमारपुणे : आपल्या फलंदाजीची हीच पद्धत असून संघाचा कर्णधार गौतम गंभीरनेदेखील आपला नैसर्गिक खेळ करण्यास सांगितले आणि त्याच्या अपेक्षेला खरे उतरलो, असे रायजिंग पुणे सुपरजायंटस् संघाविरुद्ध आयपीएल लढतीत रविवारी ६0 धावांची शानदार खेळी करणारा सामनावीर कोलकाता नाईट रायडर्सच्या सूर्यकुमार यादवने सांगितले.सूर्यकुमारने ४९ चेंडूंतील ६ चौकार व २ षटकारांसह ६0 धावांची खेळी केली. त्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक लढतीत रायजिंग पुणे सुपरजायंटस्वर दोन विकेटस्ने विजय मिळवला. सूर्यकुमारची ही आयपीएल कारकीर्दीतील सवार्ेत्तम खेळी आहे. त्याने आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर सूर्यकुमारने सांगितले, कर्णधाराने आपला नैसर्गिक खेळ करण्याचे सांगितले आणि त्याच्या अपेक्षेनुरूप आपण कामगिरी केली. आधीच्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचाही मला आनंद वाटतोय.