IPL 9 - सनरायझर्स हैदराबादचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 17:44 IST2016-04-16T16:29:50+5:302016-04-16T17:44:27+5:30

सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज शनिवारी नशीब पालटण्याची चांगली संधी या संघाकडे आहे

IPL 9 - Sunrisers Hyderabad won the toss and decided to bat | IPL 9 - सनरायझर्स हैदराबादचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

IPL 9 - सनरायझर्स हैदराबादचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

>ऑनलाइन लोकमत -
हैदरबाद, दि. १६ - राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादला नवव्या सत्रातही सुरुवातीला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज शनिवारी नशीब पालटण्याची चांगली संधी सनरायझर्स हैद्राबादकडे आहे.
 
सनराइजर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पहिला सामना ४५ धावांनी गमविला. केकेआरचे दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला नऊ गड्यांनी धूळ चारणारा हा संघ दुसऱ्या सामन्यात मात्र मुंबईकडून सहा गड्यांनी पराभूत झाला. हैदराबाद संघ दुसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर विजय नोंदवू शकतो. 
 
कोलकाता नाइट रायडर्स :
गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, शकीब अल हसन, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, पीयूष चावला, मॉर्ने मॉर्केल, सुनील नारायण, उमेश यादव, 
सनरायझर्स हैदराबाद : 
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, हुडा, आशिष रेड्डी, इऑन मॉर्गन, नमन ओझा, कर्ण शर्मा, भुवनेश्वरकुमार, मुस्तफिझूर रहमान, बरिंदर सरन
 

Web Title: IPL 9 - Sunrisers Hyderabad won the toss and decided to bat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.