IPL 9 - मिश्रा, डिकॉकपुढे पंजाब फेल, दिल्लीचा ८ गड्यांनी विजय
By Admin | Updated: April 15, 2016 23:00 IST2016-04-15T22:57:23+5:302016-04-15T23:00:08+5:30
गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबध्द माऱ्यानंतर डिकॉकने झळकवलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने पंजाबवर ८ विकेटने सहज विजय मिळवत IPL च्या या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली

IPL 9 - मिश्रा, डिकॉकपुढे पंजाब फेल, दिल्लीचा ८ गड्यांनी विजय
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबध्द माऱ्यानंतर डिकॉकने झळकवलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने पंजाबवर ८ विकेटने सहज विजय मिळवत IPL च्या या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. मिश्राच्या (११/४) शिस्तबध्द गोंलदाजीमुळे पंजाबला १११ धावापर्यंत रोखल्यानंतर डिकॉकने झळकवलेल्या (नाबाद ५९) शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने पंजाबला पराभवचा झटका दिला. पंजाबचा हा दुसरा पराभव आहे. डिकॉकने ४२ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या बळावर ५९ धावा चोपल्या तर संजू सॅमसनने त्याला उत्तम साथ देताना ३३ धावांची संयमी खेळी केली. पंजाबतर्फे अक्षर पटेल आणि संदिप शर्माने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
त्यापुर्वी, गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबध्द माऱ्यापुढे पंजाबची तगडी फलंदाजी सपसेशल फेल ठरली, एकाही फलंदाजाला आपल्या लौकीकास खेळी करता आली नाही. पंजाबने निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी ११२ धावांच आव्हान आहे. दिल्लीकडून अमित मिश्राने धारधार गोलंदाजी करताना ३ षटकात ११ धावा देत पंजाबच्या ४ फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. मनन व्होरा(३२), मोहित शर्मा (१५), शॉन मार्श(१३), अक्षर पटेल(११) आणि प्रदीप साहू(१८) यांचा अपवात वगळता एकाही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही. प्रदीप साहूने शेवटच्या षटकात १३ धावा वसूल करत संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेहली. विजय आणि शहा धावबाद झाले. जयंत यादव, झहीर खान, आणि ख्रिस मॉरिसने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.