IPL 9 - दिल्ली डेअर डेव्हिल्सचा सात गडी राखून विजय

By Admin | Updated: April 17, 2016 23:53 IST2016-04-17T23:41:01+5:302016-04-17T23:53:38+5:30

फलंदाज क्विंटन डी कॉकच्या शानदार शतकाच्या जोरावर दिल्ली डेअर डेव्हिल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर सात गडी राखून विजय मिऴविला.

IPL 9 - Delhi Daredevils beat by seven wickets | IPL 9 - दिल्ली डेअर डेव्हिल्सचा सात गडी राखून विजय

IPL 9 - दिल्ली डेअर डेव्हिल्सचा सात गडी राखून विजय

>ऑनलाइन लोकमत 
बंगळुरु, दि. १७ -  फलंदाज क्विंटन डी कॉकच्या शानदार शतकाच्या जोरावर दिल्ली डेअर डेव्हिल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर सात गडी राखून विजय मिऴविला. 
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग करताना दिल्ली डेअर डेव्हिल्सने १९.१ षटकात तीन बाद १९२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. फलंदाज क्विंटन डी कॉकच्या शानदार शतकाच्या जोरावर आणि करुण नायरच्या अर्धशकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेले आव्हान दिल्ली डेअर डेव्हिल्सला पार करता आले. या सामन्यात क्विंटन डी कॉकने तीन षटकार आणि १५ चौकार लगावत ५१ चेंडूत १०८ धावा केल्या, तर करुण नायरने ४२ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या.  ड्युमिनीने नाबाद सात धावा केल्या.  श्रेयस अय्यर अवघ्या शून्य धावेवर तंबूत परतला. संजू सॅमसन सुद्धा लवकर बाद झाला. संजू सॅमसन नऊ धावांवर झेलबाद झाला. 
याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीची कर्णधारपदाला साजेशी खेळी (७९) , त्याला एबी डिविलियर्सने (५५) दिलेली साथ  आणि शेन वॉटसन (३३) यांच्या फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली डेअर डेव्हिल्ससमोर विजयासाठी १९२ धावांचे ठेवले होते. तर ख्रिस गेल भोपळाही न फोडता माघारी परतल्यानंतर कोहली आणि डिविलियर्सने सामन्याची सूत्रे हाती घेत दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी दुस-या विकेटसाठी १०७ धावांची भागिदारी केली. कोहलीने ४८ चेंडूत ७९ धावा करताना सात चौकार आणि तीन षटकार लगावले. 
डिविलियर्सने ३३ चेंडून ५५ धावा फटकावताना नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. दिल्लीकडून झहीर खान महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात ५० धावा देत एक गडी बाद केला. 
 

Web Title: IPL 9 - Delhi Daredevils beat by seven wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.