IPL 2017 : प्रीती झिंटा आणि एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया आले एकत्र
By Admin | Updated: April 12, 2017 16:18 IST2017-04-12T13:57:16+5:302017-04-12T16:18:41+5:30
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया यांच्यातील हाडवैर आता संपले असून, दोघांमधील संबंध हळूहळू सामान्य होत आहेत.

IPL 2017 : प्रीती झिंटा आणि एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया आले एकत्र
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया यांच्यातील हाडवैर आता संपले असून, दोघांमधील संबंध हळूहळू सामान्य होत आहेत. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन संघाचा विजय साजरा केल्याची माहिती आहे. पिंकविला वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना सुरु असताना दोघे समोरासमोर आले.
त्यावेळी दोघांच्याही चेह-यावर हास्य होते. सामना संपल्यानंतर दोघांनी चर्चाही केली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघामध्ये प्रीती आणि नेस दोघांची मालकी आहे. हाशिम अमला आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेल यांच्या फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने बंगळुरुवर आठ विकेटने दणदणीत विजय मिळवला. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर विजयाच्या क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत.
तीनवर्षांपूर्वी प्रीती आणि नेसमध्ये झालेला वाद बराच गाजला होता. 2009 मध्ये प्रीती आणि नेसमधील प्रेमसंबंध संपुष्टात आले. जवळपास चार वर्ष दोघे रिलेशनशीपमध्ये होते. 2014 मध्ये वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या प्लेऑफच्या सामन्याच्यावेळी प्रीती आणि नेसमध्ये जोरदार वादावादी झाली होती. प्रीतीने नेसवर थेट मारहाण आणि विनयभंगाचे आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती.
तिने फेसबुकवरुन या संपूर्ण प्रकरणाबद्दल भाष्य केले होते. नेसला मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण उलट त्याने मला धमकावले असे तिने एफआयआरमध्ये म्हटले होते. ही संपूर्ण घटना प्रेक्षकांसमोर घडली होती. पण आता हा वाद संपला आहे. प्रीती फेब्रुवारी 2016 मध्ये लॉस एंजल्सस्थित जीनी गुडीनाऊजबरोबर विवाहबद्ध झाली.