IPL 10 - धोनीच्या कामगिरीवर नजर
By Admin | Updated: April 22, 2017 14:05 IST2017-04-22T13:55:05+5:302017-04-22T14:05:12+5:30
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनी सध्या फॉर्र्मच्या बाहेर आहे. त्याच्या खेळीला बहार यावा, हीच त्याच्या तमाम फॅन्सची इच्छा असेल.
IPL 10 - धोनीच्या कामगिरीवर नजर
- आकाश नेवे, ऑनलाइन लोकमत
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनी सध्या फॉर्र्मच्या बाहेर आहे. त्याच्या खेळीला बहार यावा, हीच त्याच्या तमाम फॅन्सची इच्छा असेल. आणि गरजेच्या वेळी तो आपल्या संघासाठी उपयुक्त खेळीदेखील करतो. आता अशीच गरज धोनीच्या पुणे सुपर जायंट्स संघाला आहे. पुण्याचा संघ गुणतक्त्यात आठव्या स्थानावर आहे. स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पुणे संघाला गरज आहे ती आजच्या सामन्यात विजय मिळवण्याची. आज थोड्याच वेळात रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध बलाढ्य सनरायजर्स हैदराबाद असा सामना आहे.
आयपीएलच्या या सत्रात पुण्याची फलंदाजी रहाणे आणि स्मिथ यांच्या बाहेर फार गेली नाही. २८ ही या स्पर्र्धेतील धोनीची सर्र्वाधिक धावसंख्या आहे. राहुल त्रिपाठी आणि बेन स्टोंक्स यांनी धावा केल्या. मात्र त्या नेहमीच अपुऱ्या पडल्या. पुण्याच्या गोलंदाजीतही धार नाही. अशोक दिंडा या सत्रात महागडा गोलंदाज ठरला. त्यासोबतच बेन स्टोंक्सला फारशी चमक दाखवता आली नाही. नाही म्हणायला इम्रान ताहीरने आतापर्यंच चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना अडचणीत आणले आहे. पण त्याला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही. शार्दुल ठाकूरला चमकदार कामगिरी करावी लागेल.