IPL 10 - दिल्लीने मुंबईला 142 धावांवर रोखले
By Admin | Updated: April 22, 2017 21:57 IST2017-04-22T20:16:08+5:302017-04-22T21:57:00+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सने बलाढय मुंबई इंडियन्सला अवघ्या 142 धावांवर रोखले. मुंबईसमोर दिल्लीचे दुबळा संघ म्हणून वर्णन केले जात होते.

IPL 10 - दिल्लीने मुंबईला 142 धावांवर रोखले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - दिल्ली डेअरडेव्हिल्सने बलाढय मुंबई इंडियन्सला अवघ्या 142 धावांवर रोखले. मुंबईसमोर दिल्लीचे दुबळा संघ म्हणून वर्णन केले जात होते. पण शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर दिल्लीने मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. दिल्लीने मुंबईच्या आठ फलंदाजांना बाद केले.
मुंबईकडून जोस बटलरने सर्वाधिक 28 धावा केल्या. पोलार्डने 26 आणि हार्दिक पांडयाने 24 धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीमुळे मुंबईला 142 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्मासह अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दिल्लीकडून अमित मिश्रा, कमिन्सने प्रत्येकी दोन तर, रबाडाने एक विकेट घेतला.
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचे पारडे या सामन्यात जड वाटत होते. युवा खेळाडू नितिश राणा, किरोन पोलार्ड, जोश बटलर, पार्थिव पटेल, रोहित शर्मा या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान दिल्लीसमोर होते.
मुंबईच्या तुलनेत दिल्लीची फलंदाजी काहीशी कमकुवत आहे. दिल्लीची सुरूवात करणारा संजू सॅमसन आणि रिषभ पंत फॉर्ममध्ये आहे. मात्र त्यांना श्रेयस अय्यर इतर फलंदाजांची साथ लाभत नाही. मुंबईचा संघ समतोल आहे. दमदार फलंदाजीसोबतच उत्तम गोलंदाजांचा ताळमेळ मुंबई संघात आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघांवर वर्चस्व गाजवत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे.