IPL 10 - मुंबईच्या विजयानंतर बटलर झाला न्यूड, व्हिडिओ व्हायरल

By Admin | Updated: May 22, 2017 01:25 IST2017-05-22T01:25:14+5:302017-05-22T01:25:14+5:30

मुंबईने पुण्यावर विजय मिळवल्यांनतर जॉस बटलर चक्क न्यूड झाला. झाले असे की, अतिशय रोमांचक सामना सुरु असलेला सामना बटलर आपल्या हॉटेल रुममध्ये पाहत होता.

IPL 10 - Butler, Nude, Video Viral after Mumbai's victory | IPL 10 - मुंबईच्या विजयानंतर बटलर झाला न्यूड, व्हिडिओ व्हायरल

IPL 10 - मुंबईच्या विजयानंतर बटलर झाला न्यूड, व्हिडिओ व्हायरल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मुंबईने पुण्यावर विजय मिळवल्यांनतर जॉस बटलर चक्क न्यूड झाला. झाले असे की, अतिशय रोमांचक सामना सुरु असलेला सामना बटलर आपल्या हॉटेल रुममध्ये पाहत होता. यावेळी त्याच्या अंगावर फक्त टॉवेल होता. शेवटच्या चेंडूवर पुण्याला चार धावांची गरज होती. त्यावेळी जॉनस्नने टाकलेला चेंडू ख्रिस्टियानने सिमारेषेकडे मारला पण मुंबईकर खेळाडूने तो अडवत थेट पार्थिव पटेलकडे फेकला. बाकी राहिलेले काम पार्थिवने केले. पार्थिवने तिसरी धाव घेताना सुंदरला बाद केले. सामना मुंबईने जिंकताच बटलर आपल्या आंगाला गुंडाळलेला टॉवेल काढून नाचू लागला. क्षणभर त्याला समजलेच नसावे की आपण टॉवेलच्या आत काही घातले नाही. बॉलरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा जोरात व्हायरल होताना दिसत आहे.
जॉस बटलर तिसऱ्या वेळी चषक जिंकणाऱ्या मुंबईचा सलमीचा फलंदाज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे तो मायदेशी परतला आहे. आयपीएलच्या दहाव्या सत्रात त्याने पार्थिव पटेलसोबत मुंबईला धडाकेबाज सुरुवात करुन दिली.
मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या एका धावेने पराभूत केले आणि आयपीएल 10 च्या विजेतेपदावर कब्जा केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटाकात 129 धावा केल्या. 130 धावांचा आकडा धावफलकावर असताना मुंबईने निराश न होता अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला. अखेरच्या षटकात पुण्याला विजयासाठी 11 धावांची गरज होती. शेवटचे शटक टाकले ते मिचेल जॉन्सनने. जॉन्सनच्या पहिल्याच चेंडूवर चौकार पडला. पण पुढच्याच चेंडूवर मैदानात जम बसवून अर्धशतकी खेळी साकारलेलास स्टीव्ह स्मिथ झेलबाद झाला. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. जॉन्सनने अचूक टप्प्यात गोलंदाजी करत एका चेंडूवर चार धावांची गरज असताना पुण्याला केवळ दोन धावा करता आल्या आणि मुंबईने सामना 1 धावेने जिंकला. स्मिथने साकारलेली अर्धशतकी खेळीवर पाणी फेरले.

 

Web Title: IPL 10 - Butler, Nude, Video Viral after Mumbai's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.