आयओची दमदार सुरुवात

By Admin | Updated: November 12, 2014 01:23 IST2014-11-12T01:23:35+5:302014-11-12T01:23:35+5:30

गतविजेत्या इंडियन ऑइल (आयओ) संघाने 49व्या बॉम्बे सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघावर 12-2 असा विजय साजरा करून दणक्यात सुरुवात केली.

IO's strong start | आयओची दमदार सुरुवात

आयओची दमदार सुरुवात

मुंबई : गतविजेत्या इंडियन ऑइल  (आयओ) संघाने 49व्या बॉम्बे सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पध्रेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघावर 12-2 असा विजय साजरा करून दणक्यात सुरुवात केली.     ‘अ’ गटाच्या या लढतीत इंडियन ऑइलने आक्रमणाच्या बळावर पहिल्या हाफमध्ये 5-2 अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर ऑइलकडून आक्रमणात भर पडली आणि राज्य पोलिसांना हतबल व्हावे लागले. रोशन मिंझ याने 4 गोल, प्रभजोत सिंह 3 गोल आणि गुरजिंदर सिंह व हाम्जा मुज्ताबा यांच्या प्रत्येकी 2 गोलने सामना राज्य पोलिसांच्या हातून हिसकावला. त्यात सुनील यादवने 1 गोल करून विजयावर 12-2 असे शिक्कामोर्तब केले. पोलिसांकडून पहिल्या हाफमध्ये आशिष चोपडे व विनोद मनुगडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
इंडियन ऑइलने सुरुवातीपासून  रघुनाथ वोकालिंगा, कोठाजित सिंह, धर्मवीर सिंह आणि एस.के. उथप्पा यांच्या दमदार आक्रमणामुळे सामन्यावर पकड घेतली. तिस:याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजिंदर सिंह याने गोल करून 1-क् अशी आघाडी मिळवली. चार मिनिटांच्या आतच मिंझ याने, तर 22व्या मिनिटाला प्रभजोतने गोल करून ही आघाडी 3-क् अशी मजबूत केली. त्यानंतर ऑइलचा गोलधडाका कायम राहिला आणि त्यांनी ही लढत 12-2 अशी जिंकून दणक्यात सुरुवात केली. पोलिसांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही.
तत्पूर्वी ‘ड’ गटाच्या सामन्यात गतउपविजेत्या एअर इंडियाने दक्षिण मध्य रेल्वेकडून पराभव टाळत सामना 4-4 असा बरोबरीत सोडविण्यात यश मिळवले. एअर इंडियाने सामन्याची दणक्यात सुरुवात करून पहिल्या हाफमध्ये 2-क् अशी आघाडी घेतली, परंतु त्यांना या आघाडीचे विजयात रूपांतर करण्यात अपयश आले. दुस:या हाफमध्ये रेल्वेकडून सडेतोड उत्तर मिळाले. रेल्वेकडून 2 गोल करण्यात आले आणि सामन्याचे चित्र त्यांच्या बाजूने फिरले. सामना संपायला 12 मिनिटे शिल्लक असताना गगनप्रीत सिंह आणि अयप्पा बी.के. यांनी गोल करून सामना 4-4 असा बरोबरीत सोडवला. (क्रीडा प्रतिनिधी)
 
ड गट : एअर इंडिया 4 (शिवेंद्र सिंह 7 मि., प्रबोध तिर्की 15 मि., गगनप्रीत सिंह 58 मि. अयप्पा बी के 64 मि.) बरोबरीत वि. दक्षिण मध्य रेल्वे 4 (मयांक जेम्स 4क् मि., 51 मि. 52 मि., इनोसेंट कुल्लू 44 मि.) 
अ गट : इंडियन ऑइल 12 (गुरजिंदर सिंह 3 मि., 46 मि., रोशन मिंझ 7 मि. 42 मि. 45 मि. 49 मि., प्रभजोत सिंह 22 मि. 27 मि. 38 मि., हम्जा मुज्तबा 24 मि. 64 मि., सुनील यादव 67 मि.) विजयी वि. महाराष्ट्र राज्य पोलीस 2 (आशिष चोपडे 23 मि., विनोद मनुगडे 26 मि.)

 

Web Title: IO's strong start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.