भारत मागणार आयओएसीकडे दाद

By Admin | Updated: June 7, 2015 01:08 IST2015-06-07T01:08:08+5:302015-06-07T01:08:08+5:30

अमेरिकन दूतावासने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तिरंदाजी पथकातील २१ सदस्यांना व्हीसा देण्यास नकार

IOC to call for India | भारत मागणार आयओएसीकडे दाद

भारत मागणार आयओएसीकडे दाद

नवी दिल्ली : अमेरिकन दूतावासने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तिरंदाजी पथकातील २१ सदस्यांना व्हीसा देण्यास नकार देण्याच्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करताना भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) युवा खेळाडूंसोबत घडलेल्या या घटनेसाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी) व अमेरिकन आॅलिम्पिक संघटनेकडे विरोध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयओएचे सचिव राजीव मेहता म्हणाले, ‘भारतीय आॅलिम्पिक संघटना या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करीत आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आमच्या तिरंदाजांची विश्वदर्जाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी वाया गेली आहे. यापेक्षा अशा प्रकारची घटना आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पुन्हा व्हायला नको, यासाठी आताच पावले उचलणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना व्हीसा नाकारण्यात आल्याची घटना प्रथमच घडली आहे. आयओए या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करीत आहे.’
मेहता पुढे म्हणाला, ‘केवळ सात-आठ खेळाडूंना व्हीसासाठी मंजुरी मिळाली आणि उर्वरित सदस्यांना नकार देण्यात आला, याचे आश्चर्य वाटले. आम्ही आयओसी व अमेरिकन आॅलिम्पिक समितीला पत्र लिहिणार असून असे का घडले, याची विचारणा करणार आहे. आता तिरंदाजांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार नसली तरी भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठी आयओसी व अमेरिकन आॅलिम्पिक संघटनेला पत्र लिहिणार आहे.’ भारतीय संघाला व्हीसा न मिळाल्यामुळे अमेरिकेतील साऊथ डेकोटा येथील यांकटोनमध्ये होणाऱ्या विश्व युथ चॅम्पियनशिपमधून माघार घ्यावी लागली. भारतीय पथकातील ३१ पैकी २१ सदस्यांना मायदेशी परतणार नसल्याचे कारण देत व्हीसा देण्यास नकार देण्यात आला.
अमेरिकन दूतावासने केवळ सात नेमबाज, दोन प्रशिक्षक व भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या एका अधिकाऱ्याला व्हीसा दिला तर २१ अन्य सदस्यांना व्हीसा देण्यास नकार दिला. भारताचे प्रसिद्ध प्रशिक्षक कोरियाचे चेन व्होम लिम यांनाही व्हीसा नाकारण्यात आला. ८ ते १४ जून या कालावधीत आयोजित स्पर्धेसाठी भारतीय पथक आज रवाना होणार होते. (वृत्तसंस्था)

Web Title: IOC to call for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.