आयओए अध्यक्ष रामचंद्रन यांनी मीडियाला टाळले
By Admin | Updated: August 29, 2014 01:28 IST2014-08-29T01:28:29+5:302014-08-29T01:28:29+5:30
भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्यावर मीडियाने प्रश्नांची सरबत्ती करताच उत्तरे देण्याआधीच त्यांनी काढता पाय घेतला

आयओए अध्यक्ष रामचंद्रन यांनी मीडियाला टाळले
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्यावर मीडियाने प्रश्नांची सरबत्ती करताच उत्तरे देण्याआधीच त्यांनी काढता पाय घेतला.
येथे एका कार्यक्रमात माध्यमांच्या प्रतिनिधींनी रामचंद्रन यांना गराडा घातला आणि आशियाई स्पर्धेसाठी भारतीय पथकाची संख्या आणि मुष्टियुद्ध संघटनेच्या निवडणूकप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आयओएने मंत्रालयाला ९१२ खेळाडूंची यादी पाठविली आहे. यावर आपले मत काय? या प्रश्नांवर ते म्हणाले, नो कमेंट्स!! थोडे थांबून पुन्हा उत्तरले. आशियाई स्पर्धेसाठी अद्याप पूर्ण पथक निवडलेले नाही. अंतिम निर्णय सरकारने घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न बॉक्सिंग संघटनेबाबत होता. पण, यावर त्यांनी पत्रकारांना एकीकडे करीत सांगितले, की मला खेळाडूंबाबत जे बोलायचे होते ते व्यासपीठावर बोललो.