इंझमाम उल् हक शर्यतीत

By Admin | Updated: April 16, 2016 03:27 IST2016-04-16T03:27:16+5:302016-04-16T03:27:16+5:30

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली असून, प्रशिक्षक निवड समितीची धुरा इंझमाम उल् हक याच्याकडे सोपविण्यात येईल, असे संकेत पीसीबीकडून

Inzamam ul Haq in the race | इंझमाम उल् हक शर्यतीत

इंझमाम उल् हक शर्यतीत

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली असून, प्रशिक्षक निवड समितीची धुरा इंझमाम उल् हक याच्याकडे सोपविण्यात येईल, असे संकेत पीसीबीकडून मिळत आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी हंगामी प्रशिक्षकाची निवडण्यावर भर देण्यात येणार आहे.
विश्वचषक टी-२० स्पर्र्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर पीसीबीने नव्या प्रशिक्षकांची शोध मोहीम सुरू केली आहे. नवीन प्रशिक्षकांसाठी निवड समिती स्थापन करण्यात येणार असून, तिच्या प्रमुखपदासाठी इंझमाम व रशीद यांनी पीसीबीशी संपर्क साधला आहे. (वृत्तसंस्था)

ढवळाढवळ सहन करणार नाही : पीसीबी
पाकिस्तान क्रिकेट संघटनेच्या (पीसीबी) अंतर्गत कारभारात सरकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. तसा ठरावच लाहोरमधील पीसीबीच्या बैठकीत केला आहे. पाकिस्तानचे क्रीडामंत्री रियाज पीरजादे यांनी बोर्डाच्या व अधिकाऱ्यांच्या कारभारावर सभागृहात टीका केली होती. त्यानंतर पीसीबीने ठराव केला आहे.

Web Title: Inzamam ul Haq in the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.