भारताला यजमानपदाचे निमंत्रण

By Admin | Updated: November 8, 2015 23:39 IST2015-11-08T23:39:33+5:302015-11-08T23:39:33+5:30

चिलीत १६ व्या अंडर १७ वर्ल्डकपच्या समारोप सोहळ्यात फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनने भारताला २०१७ च्या फिफा कॅलेंडरच्या तिसऱ्या

Invitation to host to India | भारताला यजमानपदाचे निमंत्रण

भारताला यजमानपदाचे निमंत्रण

नवी दिल्ली : चिलीत १६ व्या अंडर १७ वर्ल्डकपच्या समारोप सोहळ्यात फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनने भारताला २०१७ च्या फिफा कॅलेंडरच्या तिसऱ्या सर्वात महत्त्वपूर्ण वेळापत्रकात अंडर १७ वर्ल्डकपच्या यजमानपदाचे अधिकृत निमंत्रण दिले आहे.
जगभरातील २०० विविध देशांतील जवळपास २० कोटी प्रेक्षक या स्पर्धेचा हिस्सा बनण्याची आशा आहे आणि भारतीय भूमीवर होणारी पहिली जागतिक स्पर्धा मानली जात आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) भारतात याला फुटबॉलच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे.
भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत २४ देश सहभागी होतील आणि
स्पर्धेत ५२ सामने खेळवले जातील.
या स्पर्धेतील सामने देशातील
सहा विश्वस्तरीय फिफा प्रमाणित आयोजन स्थळावर सामने खेळवले जातील.
याप्रसंगी एआयएफएफचे महासचिव कुशल दास म्हणाले की, ‘आम्हाला जगातील तिसऱ्या सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आणि भारतीय इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळत असल्याचा अभिमान वाटतो आहे. ही राष्ट्रीय गौरवाची बाब आहे. भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी सर्वतोपरी सर्वोत्तम स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करू.’
फिफा वर्ल्ड कप आयोजन यशस्वी करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. ते म्हणाले की, ‘मी स्पर्धेशी निगडित सर्वांना एक संघाच्या रूपाने येण्यास आणि त्याला यशस्वी करण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करण्याची विनंती करतो. भारतात पहिल्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे मी आश्वासन देतो.’

Web Title: Invitation to host to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.