आयपीएल उद्घाटनात व्यत्यय
By Admin | Updated: April 7, 2015 23:37 IST2015-04-07T23:37:01+5:302015-04-07T23:37:01+5:30
मुसळधार पावसामुळे मंगळवारी येथे इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाचा उद्घाटन सोहळा सुरू होण्यात अडथळा आला.

आयपीएल उद्घाटनात व्यत्यय
कोलकता : मुसळधार पावसामुळे मंगळवारी येथे इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाचा उद्घाटन सोहळा सुरू होण्यात अडथळा आला. त्यामुळे सॉल्ट लेक स्टेडियममधील उपस्थितीत क्रिकेट रसिक निराश झाले. या उद्घाटन सोहळ्यात हृतिक रोशन, सैफ अली खान, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरसारखे बॉलीवूड सुपरस्टार आपली कला सादर करणार होते.
मुसळधार पावसानंतरही उपस्थित प्रेक्षकांना पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा होती. खराब हवामानानंतरही हजारो क्रिकेट रसिकांचा उत्साह कमी झाला नव्हता. प्रेक्षक हृतिक आणि अनुष्कासारख्या स्टार कलाकारांची कला पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे व्यासपीठावरही पाणी साचले होते. जोरदार वाऱ्यामुळे बॅनरचे कव्हरही उडून गेले. तरी प्रेक्षक स्टँडमध्ये छत्र्या घेऊन उपस्थित होते. शिवाय वीज उपकरणे झाकून ठेवण्यात आली होती.
‘ओपनिंग नाईट’दरम्यान सर्वच कलाकार एकाच वेळी मंचावर येऊन आठव्या पर्वाची सुरुवात करण्याचा नियोजित कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाची जबाबदारी सैफ अली खानवर सोपवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)