शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

आंतरराष्ट्रीय कॅरम  स्पर्धा : विश्‍वविजेता प्रशांत मोरेसह भारताच्या तीन खेळाडूंवर भारताच्या आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 8:48 PM

प्रशांत मोरेने बांग्लादेशच्या हिमायत मोल्लला २५-११, २५-०९ असे सहज पराभूत केले.

पुणे ः विश्‍वविजेता प्रशांत मोरेसह भारताच्या अन्य तीन  खेळाडूंनी ८० व्या आंतराष्ट्रीय कॅरम  फेडरेशन   चषक स्पर्धेमधील पुरुष एकेरीच्या साखळीत अपेक्षेनुसार छान प्रदर्शन करत देशाच्या आशा कायम ठेवल्या. पी वाय सी जिमखान्याच्या वातानुकलित हॉलमध्ये महिलांच्या एकेरी साखळीतही भारतीय महिलांनी जोरदार सुरुवात केली. प्रशांत मोरेने बांग्लादेशच्या हिमायत मोल्लला २५-११, २५-०९ असे सहज पराभूत केले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ‘स्विस लीग’ या झटपट स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या, माजी राष्ट्रीय विजेता जहीर पाशानेही आपली तसेच देशाची मोहीम जोरदार प्रकारे सुरु केली. त्याने मालदीवसच्या आदम आदिलला २५-०४, २५-०९ अशी मात दिली.

प्रशांत मोरे आणि जहीर पाशा प्रमाणे इर्शाद अहमद आणि राजेश गोहिल यांनीही विनासायास विजय नोंदविले. इर्शादने बांगला देशच्या मोहम्मद अली रॉबिनला २५-०९, २५-०३ तर राजेशने इटलीच्या निकोलो गॅल्लोला दोन्ही सेटमध्ये खाते देखील उघडू दिले नाही. या चार अव्वल दर्जाच्या भारतीयांसमोर मात्र श्रीलंकेचा माजी जगज्जेता निशांत ङ्गर्नांडो कडवे आव्हान असणार आहे. निशांतने  फ्रान्सचा राष्ट्रीय विजेता पिएर दुबो याला २५-०, २५-०२ असे एका अतिशय गतिमान लढतीमध्ये पूर्णपणे निष्प्रभ केले. या सर्व लढती पाचव्या  फेरीतल्या होत्या. साखळीमधून १६ पुरुषांना उप-उपांत्यपूर्व  फे  रीत तर ८ महिलांना थेट उपांत्यपूर्व  फे रीत प्रवेश मिळेल.भारताच्या आयेशा साजिद आणि रश्मी कुमारी यांनी जोसेफ रोशीता आणि रेबेका डॅलरिन या दोघी श्रीलंका प्रतिस्पर्धांना अनुक्रमे २५-१४, २५-०८ आणि २५-११, २५-१५ असे थोड्याशा प्रतिकारानंतर हरविले. भारताची विश्‍वविजेती एस. अपूर्वाने आपल्या प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केली. तिला पहिल्या सेटमध्ये श्रीलंकेच्या एम चित्रादेवीने चांगलेच झुंजविले. पण तो सेट २५-१६ असा जिंकल्यानंतर आक्रमक खेळ करत अपूर्वाने दुसरा सेट २५-०१ असा जिंकून श्रीलंकेन खेळाडूला तिची जागा दाखवली. या लढती तिसर्‍या फेरीतल्या होत्या.

या स्पर्धेमध्ये जे काही विदेशी खेळाडू जिंकले त्यात अनेक भारतीय वंशाचे खेळाडू छाप पाडताना दिसले. अमेरिकेच्या रणजीत सप्रेने जर्मनीच्या अनुभवी पीटर बोकरवर २५-१२, २५-०५ असा शानदार विजय मिळविला. तीस वर्षांपूर्वी हैदराबादहून कॅनडात स्थायिक झालेल्या वजाहत उल्ला खानने अतिसाराचा त्रास होत असून देखील मलेशियाच्या अब्दुल मुताहिम इस्माईलला २५-०६, ४-२५ आणि २५-० अशा प्रकारे पराभूत केले.युनायटेड किंगडम (यु.के)कडून खेळताना चंदन नारकर याने जर्मनीच्या डर्क पोलचौवला २५-०८, २५-०५ अशी धूळ चारली.आजपर्यंत १२ ब्रेक टू फिनिशची नोंद झाली असून त्यापैकी एकट्या झहीर पाशाने ही किमया सहा वेळा केली. याशिवाय ६ ब्लॅक टू  फिनिश   पहावयास मिळाले.---------------------------------------------------------------

महत्वपूर्ण निकालपुरुष एकेरी - पाचवी फेरी साखळी पद्धतीत 

गीयानलुल्ला क्रीस्टीयानी (इटालीयन) वि. वि. वॉलडेमीर सारीक (सरबीया)- २५-०, २५-०रनजीत सप्रे (यु.एस.ए.) वि. वि. पीटर बोकर (जर्मनी)- २५-१२, २५-०५मोहंमद मुतासीर (मालदिवस) वि. वि. क्रीस्तोफर वॉल्टर (मलेशिया)- २५-१६, २५-०७अमर सनकल (यु.के.) वि. वि. मोहंमद युनुस अबुबाकर (मालदिवस) - २५-०४, २५-०जोसेफ मेयर (स्विर्झलँड) वि. वि. ताडेज सलामुन (स्लोवेनिया)- २५-०, २५-०१दिनेत दुलक्षणा (श्रीलंका) वि. वि. नजरून इस्लाम (यु. के.)- २५-०४, २५-०५महंमद आझम खान (यु.ए.ई.) वि. वि. पंकज मोंगा (पोलँड)- २५-०९, २५-२२महिला एकेरी - पाचवी फेरी पद्धतीतएलिसा जुसियाटी (इटालिक) वि. वि. मस्नोरा हशिम (मालदिव)- २५-०२, २५-०५फातिमात रायना (मालदिव) वि. वि. पावलिना नोवाकोवास्का (पोलँड)- २५-०५, ०५-०९आफसाना नसरीन (बांग्लादेश) वि. वि. शरीफा अझेनी (मालदिव)- २५-०१, २५-०१

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश