आंतर महाविद्यालयीन ॲथ्लेटिक्स

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:32+5:302014-12-18T00:40:32+5:30

सौरभ, माधुरी यांनी जिंकली अडथळा शर्यत

Intercollegiate Athletics | आंतर महाविद्यालयीन ॲथ्लेटिक्स

आंतर महाविद्यालयीन ॲथ्लेटिक्स

रभ, माधुरी यांनी जिंकली अडथळा शर्यत
आंतर महाविद्यालयीन
वार्षिक मैदानी स्पर्धा
नागपूर : सौरभ धोत्रे आणि माधुरी चावडे यांनी रातुम नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वार्षिक मैदानी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी पुरुष आणि महिला गटाची अडथळा शर्यत जिंकली. विद्यापीठ क्रीडांगणावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
११० मीटर अडथळा शर्यतीत एनआयटीचा खेळाडू धोत्रे याने १७.५७ सेकंदांसह अव्वल स्थान गाठले. एनएमडी गोंदियाचा जागृत सेलोकर दुसऱ्या आणि एनएसएसएमचा अमित बाऊरी तिसऱ्या स्थानावर आला. महिला गटाच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत आर. एम. पटेल कॉलेज भंडाराची विद्यार्थिनी माधुरीने २२.२० सेकंद वेळ नोंदविली. ममता मेश्राम दुसऱ्या आणि वृशाली चामट तिसऱ्या स्थानावर राहिली.
महिलांच्या उंच उडीत जेसीपीईची अर्चना हिरालाल १-३० मीटर उडीसह पहिल्या स्थानावर आली. पुरुष गटात हा मान धरमपेठ सायन्स कॉलेजचा जी. राजेश याने पटकावला. दुसऱ्या दिवशीचे अन्य निकाल : थाळी फेक पुरुष अनिकेत व्यवहारे हिस्लॉप ३४.३१, ऋषभ देशमुख प्रियदर्शिनी कॉलेज ३१.८०, रमणदीपसिंग जेसीपीई २८.४३.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Intercollegiate Athletics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.