शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Commonwealth Games 2018: दहावीची परीक्षा सोडून गोल्डकोस्टला गेला अन् 'गोल्ड' घेऊन आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 12:40 IST

१५ वर्षांच्या अनिश भानवालाचा थक्क करणारा प्रवास

गोल्डकोस्ट: वयाच्या १५ व्या वर्षी सर्वसामान्य मुलं दहावीची परीक्षा देतात. जानेवारी महिना उजाडला की मुलांचा अभ्यास जोरात सुरू होतो. परीक्षेचं वेळापत्रक पाहून अभ्यासाचे तास वाढवले जातात. मार्च महिन्यात परीक्षा असल्यानं तर दिवस-रात्र अभ्यास सुरू होतो. देशभरातले विद्यार्थी असे अभ्यासात बुडाले असताना, हरियाणातला १५ वर्षांचा अनिश भानवाला मात्र याचवेळी इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्डकप आणि इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ज्युनियर वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत होता. सध्या १५ वर्षांची मुलं दहावीची परीक्षा देऊन सुट्टी एन्जॉय करत आहेत, तर अनिशनं राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णवेध घेताना अनेक विक्रम इतिहासजमा केलेत.२६ सप्टेंबर २००२ रोजी हरियाणाच्या सोनीपत जन्मलेल्या अनिशचं बालपण इतरांच्या बालपणापेक्षा खूपच वेगळं. घरातलं कोणीही नेमबाजीत नसताना, कुटुंबातल्या कोणालाच तशी आवडही नसताना अनिशला नेमबाजीचं आकर्षण वाटू लागलं. मात्र तरीही अनिशच्या वडिलांनी त्याला सतत प्रोत्साहन दिलं. आपला मुलगा वेगळं काहीतरी करु पाहतोय, हे वडिलांनी ओळखलं आणि ते ठामपणे अनिशच्या पाठिशी उभे राहिले. मग वयाच्या सातव्या वर्षी अनिशच्या हाती पिस्तुल आलं आणि कर्नालच्या शाळेतल्या शूटिंग रेंजमधून सुरू झाला एक थक्क करणारा प्रवास. हरियाणात काही काळ सराव केल्यावर अनिश चांगल्या सोयी मिळाव्यात म्हणून दिल्लीला गेला. अथक मेहनत सुरूच होती. सर्वसामान्य मुलं दहावीची तयारी करत असताना अनिशनं इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्डकप आणि इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ज्युनियर वर्ल्डकपची तयारी सुरू केली. गेल्याच महिन्यात झालेल्या या दोन्ही स्पर्धांमध्ये अनिशनं सुवर्णपदकांची कमाई केली. दहावीची परीक्षा दिल्यावर इतर मुलं सुट्टीचा प्लान करतात. मात्र अनिशनं एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली.आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांना गवसणी घातल्यामुळे अनिशचा आत्मविश्वास उंचावला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला स्वत:कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र दहावीची परीक्षा असल्यानं स्पर्धेतल्या सहभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राष्ट्रकुल स्पर्धा की दहावीची परीक्षा असा प्रश्न निर्माण झाला. अखेर दोन पेपरला न बसण्याची परवानगी मिळाली आणि अनिशची राष्ट्रकुलवारी निश्चित झाली.राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या अनिशचं नाव फारसं कोणालाच माहित नव्हतं. दोन मानाच्या स्पर्धा जिंकूनही अनिश भारतासाठी अपरिचितच होता. मात्र अनिश गोल्डकोस्टमध्ये दाखल झाला, तोच 'गोल्ड' जिंकण्याच्या उद्देशानं. तगडे प्रतिस्पर्धी, मोठ्या स्पर्धेचं दडपण, अनुभवाची कमतरता अशा प्रतिकूल स्थितीत शानदार कामगिरी करण्याचं आव्हान अनिशसमोर होतं. अनिशनं हे आव्हान अगदी लिलया पेललं. अंतिम फेरीत तर अनिशनं कमाल केली. अनिशनं या फेरीत ३० गुण घेत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं. त्यामुळे अवघ्या १५ वर्षांचा हा पठ्ठ्या सुवर्णपदक विजेता ठरला.१९९८ मध्ये अभिनव बिंद्रा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यावेळी अभिनवचं वय १५ इतकं होतं. भारताकडून सर्वात कमी वयात राष्ट्रकुलमध्ये सहभागी होण्याचा मान तेव्हापासून अभिनवच्या नावावर होता. तो यंदा अनिशनं मोडला. इतकंच नव्हे, तर सर्वात कमी वयात राष्ट्रकुलमध्ये भारताकडून सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचा विक्रमही अनिशनं त्याच्या नावावर केला. काही दिवसांपूर्वीच नेमबाज मनू भाकरनं १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. मनूचा हा विक्रमदेखील आता अनिशच्या नावावर जमा झाला आहे. भारतीय नेमबाजीचं भविष्य उज्ज्वल असल्याचं अनिशनं दाखवून दिलं आहे. याशिवाय त्याची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.   

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८