Sajan Prakash : साजन प्रकाशच्या यशामागे 'एकट्या' आईचा संघर्ष; एक वर्षाचा असताना वडील गेले सोडून अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 03:39 PM2021-07-17T15:39:23+5:302021-07-17T15:39:40+5:30

Tokyo Olympic 2021 :  टोक्योत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे तीन जलतरणपटू  सहभागी होणार आहेत. आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेच्या एकाच पर्वात भारताचे सर्वाधिक तीन जलतरणपटू पात्र ठरले आहेत.

Inspirational story of Indian swimmer Sajan Prakash set to go to Tokyo Olympic; Single mom Shantymol stand behind him  | Sajan Prakash : साजन प्रकाशच्या यशामागे 'एकट्या' आईचा संघर्ष; एक वर्षाचा असताना वडील गेले सोडून अन्... 

Sajan Prakash : साजन प्रकाशच्या यशामागे 'एकट्या' आईचा संघर्ष; एक वर्षाचा असताना वडील गेले सोडून अन्... 

googlenewsNext
ठळक मुद्देसाजननं तीन वर्षांचा असताना जलतरणाला सुरूवात केली. १० वर्षांचा असताना त्यानं हा खेळ मनावर घेतला. मेहनतीनं त्यानं जलतरणात कारकीर्द घडवली.

Tokyo Olympic 2021 :  टोक्योत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे तीन जलतरणपटू  सहभागी होणार आहेत. आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेच्या एकाच पर्वात भारताचे सर्वाधिक तीन जलतरणपटू पात्र ठरले आहेत. त्यापैकी एक असलेल्या साजन प्रकाश ( Sajan Prakash) याचा प्रवास संघर्षमयी आहे. त्याच्या या यशामागं त्याच्या आईचा वीजे शांत्यमोल ( VJ Shantymol) यांचा सिंहाचा वाटा आहे. साजन जेव्हा युवा होता आणि बँगळुरूला सरावासाठी जायचा तेव्हा प्रत्येक आठवड्याला त्याची आई त्याला भेटण्यासाठी जायची, परंतु हा प्रवास एवढा सोपा नव्हता. अनेक संघर्षाचा सामना त्यांना करावा लागायचा.

पाकिस्तानची ट्वेंटी-२०त रिकॉर्डतोड खेळी, इंग्लंडची जिरवत टीम इंडियाला दिला इशारा! 

शांत्यमोल नेयेवेली येथील आपल्या घरापासून ३८० किलोमीटरचा प्रवास रात्री करायच्या आणि सोबत तीन टॉर्च ठेवायच्या. या प्रवासासाठीचा रस्ता एवढा खराब होता की कधीकधी बसचा टायर पंक्चर व्हायचा आणि ड्रायव्हरला मदतीसाठी त्या टॉर्च सोबत ठेवायच्या. त्या स्वतःही टायर बदलण्यात मदत करायच्या. अशात परतीच्या प्रवासात ऑफिसवर वेळेवर पोहोचण्याचीही त्यांना धडपड करावी लागायची. इंडियन एक्स्प्रेसला त्यांनी सांगितले,''मला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता ऑफिसला पोहोचायचे असायचे. नाहीतर अर्ध्या दिवसाचा पगार कापला जायचा. राज्य परिवहनची बस सारखी थांबायची अन् अनेकदा पंक्चर व्हायची. मी तीन टॉर्च घेऊन प्रवास करण्यास सुरुवात केली आणि अनेकदा मी स्वतः पंक्चर दुरुस्त केला.'' 

धर्माच्या भिंती झुगारून शिवम दुबेनं मुस्लिम मुलीशी केलं लग्न, जाणून घ्या कोण आहे अंजुम खान!

साजनला त्याच्या वडिलांची साथ मिळाली नाही. साजनची आई स्वतःही जलतरणपटू होत्या आणि त्यांनी १९८७च्या जागतिक व आशियाई कनिष्ठ स्पर्धेत १०० व २०० मीटर स्पर्धेत सहभाग घेतला होता. १९९२साली त्यांचं लग्न झालं अन् १९९३मध्ये साजनचा जन्म झाला. एक वर्षानंतर त्याच्या वडिलांनी घर सोडलं आणि त्यानंतर एकट्या आईनं साजनचे पालन केलं. ''साजनला चांगलं बालपण देणारं, कुटुंबात कोणीच नव्हतं. त्याचे वडील आम्हाला सोडून गेले आणि खरं सांगू तर ते बरेच झालं. ते दारू प्यायचे आणि हिंसक होते, अशा माणसासोबत राहणं मानसिकदृष्ट्या अवघड होते,''असे त्यांनी सांगितले.    


साजननं तीन वर्षांचा असताना जलतरणाला सुरूवात केली. १० वर्षांचा असताना त्यानं हा खेळ मनावर घेतला. मेहनतीनं त्यानं जलतरणात कारकीर्द घडवली.  

Web Title: Inspirational story of Indian swimmer Sajan Prakash set to go to Tokyo Olympic; Single mom Shantymol stand behind him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.