पर्यटक, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांवर महागाईचा बोजा
By Admin | Updated: August 6, 2016 03:46 IST2016-08-06T03:46:25+5:302016-08-06T03:46:25+5:30
ब्राझीलमधील विविध शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेला फुटबॉल विश्वचषक आणि आता त्यानंतर रिओमध्ये आॅलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले

पर्यटक, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांवर महागाईचा बोजा
रिओ- ब्राझीलमधील विविध शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेला फुटबॉल विश्वचषक आणि आता त्यानंतर रिओमध्ये आॅलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या दोन्ही स्पर्धा आयोजनाचा खर्च एवढा झाला, की रिओ शासन अर्थिक संकटात सापडले. हे संकट दूर करण्यासाठी रिओ आयोजन समितीने या स्पर्धेसाठी येणाऱ्या पर्यटक, विविध देशांचे पदाधिकारी, पत्रकार, क्रीडापे्रमी यांच्यावर महागाईचा बोजा टाकण्यात येत असल्याची जोरदार चर्चा येथे होत आहे. मुख्य पत्रकार कक्षाबाहेरील (एमपीसी) उभारण्यात आलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या काही पत्रकारांनी तेथील खाद्यपदार्थांचे भाव पाहून भुवया वर केल्या. पण करणार काय भूक लागली म्हणजे जेवण तर करणे आलेच, अन्यथा काही तरी वरवरचे खायचे झाले तरी त्यांचे भावसुद्धा परवडण्यासारखे नाही. सर्व पत्रकारांना लंडन आॅलिम्पिक स्पर्धेच्या मुख्य पत्रकार कक्षाची आठवण झाली. तेथे काही तरी खाण्यासाठी (स्नॅक्स) मोफत होते. येथे फक्त कॉफीसाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत. अन्यथा जे काही खायचे त्याचे भरमसाट पैसे मोजायचे. उदा. पिण्याच्या पाण्याची बाटली (५०० एमएल) १० ब्राझिलियन रियाल म्हणजे भारतीय रुपयांत दोनशे रुपये (ब्राझीलचा १ रियाल म्हणजे भारताचे २० रुपये); जेवण वजनावर ९८ रियाल = १९६९ रुपये; कॉफी ६ रियाल = १२० रुपये; पिझ्झा ३६ रियाल = ७२० रुपये; दूध ८ रियाल = १६० रुपये; सूप १८ रियाल = ३६० रुपये असे पैसे भरावे लागतात.