भारत- पाक लढत जोड

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:56+5:302015-02-14T23:50:56+5:30

गेल्या अडीच महिन्यात सपशेल ढेपाळलेली गोलंदाजी ही आणखी एक डोकेदुखी. ईशांत शर्मा बाहेर आहे तर भुवनेश्वरकुमार देखील फॉर्ममध्ये ानही. अशावेळी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर भिस्त राहील. या दोन्ही गोलंदाजांमध्ये शिस्तबद्ध मारा करण्याची क्षमता कमी आहे. स्टुअर्ट बिन्नी हा मोठ्या संघाविरुद्ध विजयात योगदान देण्यात आतापर्यंत तरी यशस्वी झालेला नाही. फिरकी माऱ्यासाठी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची क्षमता सारखीच आहे. जडेजा हा फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, ही बाब वेगळी.

Indo-Pak match | भारत- पाक लढत जोड

भारत- पाक लढत जोड

ल्या अडीच महिन्यात सपशेल ढेपाळलेली गोलंदाजी ही आणखी एक डोकेदुखी. ईशांत शर्मा बाहेर आहे तर भुवनेश्वरकुमार देखील फॉर्ममध्ये ानही. अशावेळी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर भिस्त राहील. या दोन्ही गोलंदाजांमध्ये शिस्तबद्ध मारा करण्याची क्षमता कमी आहे. स्टुअर्ट बिन्नी हा मोठ्या संघाविरुद्ध विजयात योगदान देण्यात आतापर्यंत तरी यशस्वी झालेला नाही. फिरकी माऱ्यासाठी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची क्षमता सारखीच आहे. जडेजा हा फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, ही बाब वेगळी.
पाक संघात मिस्बाह, यूनिस आणि आफ्रिदी हे अनुभवी त्रिकूट आहे. याशिवाय प्रतिभावान उमर अकमल, आणि फॉर्ममध्ये असलेला शोएब मकसूद हे देखील प्रभावी ठरू शकतात. गोलंदाजीत वहाब रियाज आणि सात फूट उंची लाभलेला मोहम्मद इरफान यांचा मारा निर्णायक ठरेल.
उभय संघ यातून निवडणार
भारत : महेंद्रसिंग धोनी कर्णधार, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी.
पाकिस्तान : मिस्बाह उल हक कर्णधार, शहीद आफ्रिदी, अहमद शहजाद, नासिर जमशेद, हॅरिस सोहेल, शोएब मक्सूद, अहसान आदील, युनिस खान, उमर अकमल, मोहम्मद इरफान, वहाब रियाज, यासिर शाह, सोहेल खान, सर्फराज अहमद आणि राहत अली.

Web Title: Indo-Pak match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.