भारत-बांगला पत्रकारांचा दबदबा
By Admin | Updated: March 16, 2015 23:51 IST2015-03-16T23:51:06+5:302015-03-16T23:51:06+5:30
वर्ल्डकपचे वृत्तांकन करण्यासाठी भारताचा प्रसारमाध्यमांचा ५० प्रिंट, ईलेक्ट्रॉनिक्स, फोटो आणि व्हिडिओ पत्रकांरांचा सर्वात मोठा चमू आॅस्टे्रलियामध्ये दाखल झालेला आहे.

भारत-बांगला पत्रकारांचा दबदबा
मेलबोर्न : वर्ल्डकपचे वृत्तांकन करण्यासाठी भारताचा प्रसारमाध्यमांचा ५० प्रिंट, ईलेक्ट्रॉनिक्स, फोटो आणि व्हिडिओ पत्रकांरांचा सर्वात मोठा चमू आॅस्टे्रलियामध्ये दाखल झालेला आहे. दखल घेण्याची बाब
म्हणजे बांगलादेशचा पत्रकार चमू देखील ४० सदस्यांसह येथे उपस्थित आहे.
बांगला पत्रकांरांना आशा आहे की आपले ‘टायगर्स’ बलाढ्य भारताला धक्का देतील. त्याचवेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डचे
अध्यक्ष नजमुल हसन उपांत्यपूर्व फेरीतील भारत वि. बांगलादेश
सामना पाहण्यासाठी आॅस्टे्रलियामध्ये उपस्थित राहणार आहेत. जर
का भारताला नमवून बांगलादेश
सेमी फायनलला पोहोचला तर
बांगला खेळाडूंसाठी मोठ्या
रक्कमेची घोषणा केली जाऊ
शकते. (वृत्तसंस्था)
नातेवाईकांचा जलवा
वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुध्द सलग दोन शतक झळकावल्यानंतर महमूदुल्लाह बांगलादेशमध्ये सर्वांचा आवडता खेळाडू बनला आहे. मात्र क्रिकेट विश्वात ‘रयाध’ टोपण नावाने ओळखला जात असलेला हा खेळाडू मागील दोन वर्षांपासून कठीण काळाशी झगडत होता.
त्यामुळे संघातील त्याच्या जागाविषयी शंका निर्माण केली जात होती. त्याचवेळि या कठीण प्रसंगी त्याची केवळ एकाच व्यक्तीने नेहमि साथ
दिली आणि ती व्यक्ती म्हणजे संघाचा माजी कर्णधार मुशफिकुर रहिम. महमूदुल्लाह आणि रहिम यांनी इंग्लंड विरुध्द निर्णायक भागीदारी केली होती. हे दोघेही चांगले मित्र असून विशेष म्हणजे दोघांच्या पत्नी बहीणी असून त एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत. त्यामुळे या दोघांचा खेळ देखील चांगलाच बहरत आहे.
रुबेलने वेधले प्रसारमाध्यमांचे लक्ष
मेलबर्न : बांगलादेशच्या सराव सत्राच्यावेळी भारतीय प्रसारमाध्यमांचे सर्वाधिक लक्ष वेगवान गोलंदाज रुबेल हुसैन याने खेचले. आपल्याच देशाच्या एका अभिनेत्रीसोबत सुरु असलेल्या कथित वादामुळे सध्या रुबेल चर्चेत आहे.
इंग्लंड विरुध्द शेवटच्या दोन षटकांत दोन बळी घेत संघाला विजय मिळवून देणारा रुबेल रातोरत हिरो झाला आणि हिथ स्ट्रीक पासून प्रशिक्षक चंदिका हथुरासिंघे सर्वांनीच त्याचा बचाव केला. हथुरासिंघेने सांगितले की, आॅस्टे्रलियामध्ये आल्यापासून आम्ही रुबेलशी त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळेचे त्याचे पुर्ण लक्ष केवळ क्रिकेटकडे लागले. त्याच्याशी आम्ही केवळ क्रिकेट बाबतच बोलतो. तो एक व्यावसायिक खेळाडू असून त्यानुसार तो संघामध्ये मिसळला आहे, असेही हथुरासिंघे यांनी सांगितले.