भारताचा झिम्बाब्वेला 'क्लीन स्विप'

By Admin | Updated: June 15, 2016 23:45 IST2016-06-15T17:57:25+5:302016-06-15T23:45:24+5:30

भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिस-या वन-डेत भारतानं झिम्बाब्वेचा 10 गडी राखून धुव्वा उडवला आहे.

India's Zimbabwean 'Clean Swap' | भारताचा झिम्बाब्वेला 'क्लीन स्विप'

भारताचा झिम्बाब्वेला 'क्लीन स्विप'

 ऑनलाइन लोकमत

हरारे, दि. 15- भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिस-या वन-डेत भारतानं झिम्बाब्वेचा 10 गडी राखून धुव्वा उडवला आहे. नागपूरचा सुपुत्र  फैज फझलनं पदार्पणातच नाबाद राहत  61 चेंडूंत 7 चौकारांसह 1 षटकार लगावत 55 धावा काढून अर्धशतक पार केलं आहे. तर लोकेश राहुलनंही नाबाद खेळीच्या जोरावर 4 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला आहे. फैज फझल आणि लोकेश राहुलनं नाबाद खेळत 126 धावांची भागीदारी केली आहे. 
 
(झिम्बाब्वेचा १२३ धावांत खुर्दा, भारताची ‘क्लीन स्वीप’च्या दिशेने वाटचाल) 
 

तत्पूर्वी झिम्बाब्वेकडून शिंबदाने ३८ धावांची खेळी केली. सलामीविर चामू चिभाभाने २७ धावांची खेळी केली. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. ग्रीम क्रेमर, तेंडाई चतारा, डाई चिसोरो, क्रेग इरविन, नेविले मेजिवा, तिमीके यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारताकडून जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करताना ४ फलंदाज बाद केले, तर चहलने २, पटेल आणि कुलकर्णीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद करत चांगली गोलंदाजी केली. 

 

 
 

 

Web Title: India's Zimbabwean 'Clean Swap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.