भारताचा १५ कुस्तीपटूंचा संघ जाहीर

By Admin | Updated: July 19, 2015 22:09 IST2015-07-19T22:09:08+5:302015-07-19T22:09:08+5:30

अस्ताना (कजाकिस्तान) येथे २३ ते २६ जुलैदरम्यान होणाऱ्या कप आॅफ प्रेसिडेंट आॅफ द रिपब्लिक आॅफ कजाकिस्तान स्पर्धेसाठी भारताचा १५ कुस्तीपटूंचा

India's wrestling wrestling team announced | भारताचा १५ कुस्तीपटूंचा संघ जाहीर

भारताचा १५ कुस्तीपटूंचा संघ जाहीर

नवी दिल्ली : अस्ताना (कजाकिस्तान) येथे २३ ते २६ जुलैदरम्यान होणाऱ्या कप आॅफ प्रेसिडेंट आॅफ द रिपब्लिक आॅफ कजाकिस्तान स्पर्धेसाठी भारताचा १५ कुस्तीपटूंचा संघ कुस्ती महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आला.
महासंघाच्या पत्रकानुसार ही स्पर्धा भारतीय संघाला ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान अमेरिका येथील लास वेगास येथे होणाऱ्या विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वाची ठरेल आणि भारतीय मल्लांचे सराव सामनेसुद्धा होतील.
संघ असा :
फ्रीस्टाईल : अमित कुमार ५७ किलो गट , सोनू ६१ कि., अरुण कुमार ७० कि., नरसिंह यादव ७४ कि., नरेश कुमार ८६ कि., मौसम खत्री ९७ कि., कृष्ण १२५ कि.; ग्रीकोरोमन प्रकार : नितीन ५९ कि., दीपक ६६ कि., मोहम्मद रफिक होली ७१ कि., गुरप्रित सिंह ७५ कि., हरप्रित सिंह ८० कि., मनोजकुमार ८५ कि., हरदीप ९८ कि., नवीन १३० कि. (वृत्तसंस्था)

Web Title: India's wrestling wrestling team announced