वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताचा दणदणीत विजय

By Admin | Updated: February 10, 2015 18:29 IST2015-02-10T16:58:58+5:302015-02-10T18:29:08+5:30

क्रिकेट वर्ल्डकपच्या आज खेळल्या गेलेल्या वन-डे सराव सामन्यात भारताने अफगाणिस्ताविरुध्द दणदणीत विजय मिळविला.

India's winning sound in the World Cup practice match | वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताचा दणदणीत विजय

वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताचा दणदणीत विजय

ऑनलाइन लोकमत
एडलेड ओव्हल (दक्षिण ऑस्ट्रेलिया ), दि. १० - रविवारी पाकविरुध्द खेळल्या जाणा-या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असतानाच क्रिकेट वर्ल्डकपच्या आज खेळल्या गेलेल्या वन-डे सराव सामन्यात भारताने अफगाणिस्ताविरुध्द दणदणीत विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ५ गडी गमावत ३६४ धावा केल्या. सलामील आलेल्या रोहित शर्माने अफलातून खेळी करीत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. रोहित शर्माने अवघ्या १२२ चेंडूत दीड शतकी (१५० धावा ) खेळी साकारली. यावेळी त्याने ७ षटकार आणि १२ चौकार सीमापार धाडले. अजिंक्य राहणने नाबाद ८८, सुरेश रैना ७५, शिखर धवन २, विराट कोहली ५, महेंद्र सिंग धोनी १०, रवींद्र जाडेजा नाबाद ११ धावांच्या बळावर भारतीय संघाने ५ बाद ३६४ धावा केल्या. भारताने दिलेले आव्हान पेलण्यासाठी उतरलेला अफगाणिस्तान संघाला सर्वबाद केवळ २११ धावा करता आल्या. अफगाणिस्तानकडून नावरोज मंगलने सर्वाधिक ६० धावा केल्या, उस्मान गणी ४४, जावेद अहमदी १७, अश्घर २०, नजीबुल्ल्हा ४, मोहम्मद नबी १ , अफसर नाबाद २४ धावा यांच्या बळावर अफगाणिस्तान संघाला ५० षटकात ८ बाद २११ धावा करता आल्या. भारतीय संघाला दुबळया अफगाणिस्ताविरुध्द मिळालेला विजय मोठा नसला तरी खेळाडूंचे मनोधैर्य उंचावणारा नक्कीच ठरु शकतो.

Web Title: India's winning sound in the World Cup practice match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.