भारताची 'विजयादशमी', अश्विनने केले किवीचे 'दहन'
By Admin | Updated: October 11, 2016 21:50 IST2016-10-11T16:55:46+5:302016-10-11T21:50:08+5:30
भारतीय क्रिकेट संघाने न्युझीलंडचा 321 धावांनी पराभव करत एकप्रकारे आज दसऱ्याचे सीमोल्लघंनचं केले आहे. इंदौर कसोटी सामना जिंकत न्युझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली.

भारताची 'विजयादशमी', अश्विनने केले किवीचे 'दहन'
>ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. 11 - भारतीय क्रिकेट संघाने न्युझीलंडचा 321 धावांनी पराभव करत एकप्रकारे आज दसऱ्याचे सीमोल्लघंनचं केले आहे. इंदौर कसोटी सामना जिंकत न्युझीलंड विरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. या कसोटी विजयासह भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान भक्कम केले आहे. विराट कोहली,अजिंक्य रहाणे, पुजारा, आर. अश्विन आणि जाडेजाच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताने इंदौर कसोटीत विजयाचे सीमोल्लंघन केले आहे.
ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विनने पुन्हा एकदा अचूक मारा करताना सामन्यात 13 बळी घेतले. भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे न्युझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आश्विननंतर जाडेजाने आपल्या फिरकीतील जादू दाखवली. जाडेजाने सामन्यात चार फलंदांजांना तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या डावात जाडेजाने रॉचीची जागा घेण्यासाठी आलेल्या जेम्सला खाते ही न खोलता चालते केले. त्यानंतर संयमी खेळी करणाऱ्या मार्टिन गप्तिलला बाद करत जडेजाने भारताच्या विजयातील मोठा अडथळा दुर केला. उमेश यादवने एका फलंदाजांला बाद केले.
दरम्यान, इंदूरच्या होळकर मैदानावर तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने केलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने 216 धावांवर 3 गडी बाद असताना डाव घोषित केला. डाव घोषित केला तेव्हा चेतेश्वर पुजारा 101 तर अजिंक्य रहाणे 23 धावांवर खेळत होता. गौतम गंभीरने 56 धावांत सहा चौकारांसह 50 धावांची खेळी केली. गंभीरचं कसोटी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक ठरलं. अर्धशतक झळकावल्यानंतर गंभीर जीतन पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
भारताने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. उमेश यादवने सलामवीर लॅथमला पायचित करत भारताला पहिले यश मिळवून दिले.त्यानंतर अश्विन, जाडेजा,शमी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे न्युझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले. ठराविक अंतरावर गडी गमावल्यामुळे यजमानांना सामना गमावावा लागला.
पहिल्या डावात कोहली (२११) , अजिंक्य रहाणे (१८८) आणि रोहीत शर्मा (52) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिला डाव ५ बाद ५५७ धावसंख्येवर घोषित केला होता. तर न्युझीलंडला 299 धावांत गुडांळत सामन्यात 258 धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात अश्विनने 6 फलंदाज बाद केले होते. तर जाडेजाने 2 फलंदजांना तंबूचा रास्ता दाखवला होता.
संक्षिप्त धावफलक
पहिला डाव -
भारत - ५ बाद ५५७ धावसंख्येवर घोषित , विराट कोहली २११, अजिंक्य रहाणे १८८, रोहीत शर्मा (52).
गोलंदाजी - बोल्ट आणि पटेल प्रत्येकी 2 बळी
न्युझीलंड - सर्वबाद 299, गुप्टिल 72, नीशम 71
गोलंदाजी - अश्विन 6, जाडेजा 2 बळी
दुसरा डाव -
भारत - 3 बाद 216 धावसंख्येवर घोषित , पुजारा 101, गंभीर 50
गोलंदाजी - पटेल 2 बळी
न्युझीलंड - सर्वबाद 153, टेलर 32, गुप्टील 29
गोलंदाजी - अश्विन 7, जाडेजा 2, यादव 1 बळी