शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Diamond League 2024 : दुखापतीनं त्रस्त असतानाही मस्त कामगिरी; नीरजनं १४ दिवसांत मोडला ऑलिम्पिक रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 10:14 IST

डायमंड लीग स्पर्धेत त्याने ८९.४९ मीटर भाला फेकला. या स्पर्धेतील नीरजचा हा आतापर्यंतचा हा सर्वात बेस्ट थ्रो आहे. 

Neeraj Chopra Broke Self Olympics Record : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पुन्हा एकदा लक्षवेधून घेतले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरजनं डायमंड लीग स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये सेट केलेला स्वत:चा विक्रम मागे टाकला. फक्त १४ दिवसांच्या कालावधीत त्याने पॅरिस ऑलिम्पिकमधील ८९.४५ मीटर भालाफेकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. लुसाने येथील डायमंड लीग स्पर्धेत त्याने ८९.४९ मीटर भाला फेकला. या स्पर्धेतील नीरजचा हा आतापर्यंतचा हा सर्वात बेस्ट थ्रो आहे. विशेष म्हणजे हार्नियासारख्या समस्येनं त्रस्त असतानाही त्याने ही कमालीची कामगिरी करुन दाखवलीये. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मागे राहिलेल्या खेळाडूनं ९० मीटरसह टाकले मागे

नीरज चोप्रा बेस्ट थ्रोसह ९० मीटरच्या टार्गेटच्या अगदी जवळ पोहचला. पण तरीही त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्स याने त्याला मागे टाकले. या भालाफेकपटूनं ९०.६१ मीटर भाला फेकला. अँडरसन पीटर्स पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजच्या मागे राहिला होता. त्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

डायमंड लीग स्पर्धेत अशी राहिली नीरजची कामगिरी; अखेरच्या थ्रो ठरला बेस्ट डायमंड लीग स्पर्धेतील अखेरच्या थ्रो नीरजनं लांब अंतरावर फेकत एक नवा विक्रम सेट केला. पहिल्या प्रयत्नात नीरजनं ८२.१० मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत ८३.२१ मीटर अंतरावर भाला फेकला. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ८३.१३ आणि ८२.३४ अंतरावर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात ८५.५८ मीटर भाला फेकल्यानंतर शेवटच्या प्रयत्नात त्याने  ८९.४९ मीटरसह बेस्ट थ्रोची नोंद केली. 

९० मीटरच्या टार्गेटसाठी धडपडतोय नीरज नीरज चोप्रानं आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत ९० मीटर अंतर भाला टाकलेला नाही. टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल मिळवल्यापासून तो ९० मीटरच टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरताना दिसते. टार्गेट त्याच्या टप्प्यात दिसत असले तरी तो इथंपर्यंत पोहचू शकलेला नाही. स्टॉकहोम डायमंड लीग स्पर्धेत त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरीची नोंद केली होती. २०२२ मध्ये त्याने या स्पर्धेत ८९.९४ मीटर अंतरावर भाला फेकला होता. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा