भारताचे दोन डझन गोल!

By Admin | Updated: April 6, 2017 04:22 IST2017-04-06T04:22:15+5:302017-04-06T04:22:15+5:30

यजमान भारताने पाचव्या आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत नेपाळचा धुव्वा उडविला

India's two dozen goals! | भारताचे दोन डझन गोल!

भारताचे दोन डझन गोल!

भोपाल : यजमान भारताने पाचव्या आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत नेपाळचा धुव्वा उडविला. त्यांनी दणादण २४ गोल नोंदवत स्पर्धेत शानदार सुरुवात केली.
ऐशबाग स्टेडियम येथे झालेल्या ‘ब’ गटातील सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत तीन गोल नोंदवले. पहिला गोल केरकेटाने दुसऱ्या मिनिटाला नोंदवला. दुसरा गोल मोहम्मद सैफ खानने चौथ्या मिनिटाला आणि तिसरा गोल मनिंदर सिंहने पाचव्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर मात्र भारताने प्रतिस्पर्धी संघाला संधीच दिली नाही. एकापाठोपाठ एक असे गोल नोंदवत त्यांनी मध्यंतरापर्यंत १२-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफमध्ये भारताने एक डझनभर गोल नोंदवले. (वृत्तसंस्था)

Web Title: India's two dozen goals!