साहेबांच्या देशात भारताची ‘कसोटी’
By Admin | Updated: July 9, 2014 01:57 IST2014-07-09T01:57:19+5:302014-07-09T01:57:19+5:30
इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणा:या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीची देहबोली बरेच काही सांगून गेली.

साहेबांच्या देशात भारताची ‘कसोटी’
नॉटिंघम : इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणा:या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीची देहबोली बरेच काही सांगून गेली. इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकनेही चेह:यावरील स्मित कायम राखत प्रतिस्पध्र्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. उभय कर्णधारांच्या चेह:यांवर संयम दिसत असला तरी मनात मात्र खलबत सुरू होते. धोनी आणि कुक यांच्यासाठी आगामी मालिका म्हणजे तारेवरची कसरत ठरणार आहे. अनुकुल निकाल लागला नाही तर उभय कर्णधारांचे स्थान धोक्यात असल्याचे संकेत यापूर्वीच मिळालेले आहे.
कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला सात सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे तर एका लढतीत अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. मायदेशात यजमान संघाला श्रीलंकेविरुद्ध मालिका गमवावी लागली. तर गेल्या तीन वर्षात धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला उपखंडाबाहेर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे ‘हॉट सिट’वर असलेल्या दोन्ही कर्णधारांपुढे ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. बुधवारपासून प्रारंभ होणा:या पहिल्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट बिन्नीला पदार्पणाची संधी मिळण्याचे संकेत दिसत आहेत.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर, ईश्वर पांडे, पंकज सिंग, वरुण अॅरोन, रिद्धिमान साहा.
इंग्लंड : अॅलिस्टर कूक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलेन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ािस जॉर्डन, प्लंकेट, मॅट प्रायर, रॉबसन, जो रुट, बेन स्टोक्स, ािस वोक्स.