भारताचे ‘लक्ष्य’ आॅलिम्पिक कोटा
By Admin | Updated: August 5, 2015 23:32 IST2015-08-05T23:32:06+5:302015-08-05T23:32:06+5:30
अजरबेजान (गाबेला) येथे आजपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे मुख्य लक्ष्य असेल ते

भारताचे ‘लक्ष्य’ आॅलिम्पिक कोटा
नवी दिल्ली : अजरबेजान (गाबेला) येथे आजपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे मुख्य लक्ष्य असेल ते आॅलिम्पिक पात्रतेचे. या स्पर्धेतून चमकदार कामगिरीच्या जोरावर आॅलिम्पिक कोटाद्वारे थेट प्रवेश मिळवण्यासाठी भारताचे रायफल, पिस्तुल आणि शॉटगन नेमबाज प्रयत्नशील असतील. विशेष म्हणजे भारताच्या आतापर्यंत ५ खेळाडूंनी ओलिम्पिक कोटाद्वारे पात्रता मिळवली असून गाबेला येथे रंगणाऱ्या स्पर्धेद्वारे ३४ खेळाडूंचा आॅलिम्पिक प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे या स्पर्धेत मोठी चुरस दिसून येईल.
या स्पर्धेत अभिनव बिंद्रा, गगन नारंग आणि जीतू रॉय या अव्वल नेमबाजांवर भारताची मदार असून या तिघांव्यतिरीक्त अपूर्वी चंदेला आणि गुरप्रीत सिंग यांनी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. दरम्यान यावेळी हिना सिंग, मानवजीत सिंग संधू, विजय कुमार, आयोनिका पाल, चैन सिंग, अंकुर मित्तल आणि मोहम्मद आसाब या नेमबाजांना देखील आॅलिम्पिक कोटआंतर्गत प्रवेश मिळवण्याची नामी संधी आहे.