भारताची अस्तित्वाची टक्कर पाकिस्तानशी

By Admin | Updated: October 2, 2014 02:05 IST2014-10-02T02:05:00+5:302014-10-02T02:05:00+5:30

आशियातील दिग्गज आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत, पाकिस्तान हे दोन संघ गुरुवारी आशियाई स्पर्धेतील हॉकीच्या फायनलमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत़

India's survival collision with Pakistan | भारताची अस्तित्वाची टक्कर पाकिस्तानशी

भारताची अस्तित्वाची टक्कर पाकिस्तानशी

इंचियोन : आशियातील दिग्गज आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत, पाकिस्तान हे दोन संघ गुरुवारी आशियाई स्पर्धेतील हॉकीच्या फायनलमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत़ या दोन्ही संघांचे लक्ष्य गोल्ड मिळवून थेट रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळविणो हेच असणार आह़े 
उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने यजमान दक्षिण कोरियाला 1-क् ने धूळ चारून थाटात अंतिम फेरी गाठली आह़े गत चॅम्पियन पाकिस्तानने मलेशियाला पेनल्टी शुटआऊटवर 6-5 ने धूळ चारून घरचा रस्ता दाखविला होता़ भारत आणि पाकिस्तान हे संघ आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये तब्बल 24 वर्षानंतर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत़  
यापूर्वी भारत आणि पाक हे संघ 199क् मध्ये बीजिंग आशियाई स्पर्धेतील फायनलमध्ये एकमेकांशी झुंजले होत़े तेव्हा पाकने 3-2 ने भारतावर सरशी साधली होती़ भारताने 1998 च्या बँकॉक आशियाई स्पर्धेतील हॉकीमध्ये अखेरचे सुवर्ण पटकावले होत़े 
चार वर्षापूर्वी ग्वांग्झू येथे भारताला तिस:या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते, तर 2क्क्6 मध्ये भारत उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नव्हता आणि 2क्क्2 च्या आशियाई स्पर्धेत हा संघ उपविजयी राहिला होता़ भारत-पाक हे संघ आशियाई स्पर्धेत एकाच गटात होत़े साखळी लढतीत पाकने भारतावर 2-1 ने विजय मिळविला होता, तर पाकने अन्य लढतीत श्रीलंकेवर 14-क् ने, चीनवर 2-क् असा, तर ओमानला 8-क् ने धूळ चारली होती, तर भारताने पहिल्या लढतीत लंकेवर 8-क् ने, ओमानवर 7-क् आणि चीनवर 2-क् ने सरशी साधली होती़ जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेल्या भारताला द. कोरियाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती; मात्र पाक विरुद्धच्या लढतीत सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी आतुर असेल़  (वृत्तसंस्था)

 

Web Title: India's survival collision with Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.