शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भारताची दमदार विजयी सलामी, छेत्रीची कमाल-टीम इंडियाची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:58 IST

एएफसी आशियाई चषक : थायलंडवर ४-१ ने मात

अबुधाबी : एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला. सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर भारताने थायलंडचा ४-१ ने धुव्वा उडविला. मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर भारताने दुसऱ्या सत्रात तीन गोलचा धडाका लावला. अनिरुध थापा आणि बदली खेळाडू जेजे लालपेखलुआ यांनीही लक्ष्य साधले. छेत्रीने पहिल्या गोलसह लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याची कामगिरीही केली.

येथील अल नाह्यान स्टेडियमवर स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखालील भारताने अ गटात आघाडी घेतली. भारताने तीन गुण वसूल केले. या गटात बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली होती. खाते सर्वप्रथम उघडण्यात भारताला यश आले. २६ व्या मिनिटाला थ्रो-इन झाल्यावर आशिक कुरुनीयन याने बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक चातचाई बुदप्रोम याच्या दिशेने चेंडू मारला होता, पण मध्येच चेंडू थीराथोन बुनमाथन याच्या हाताला लागून उडाला. पेनल्टी क्षेत्रात हे घडल्यामुळे भारताला पेनल्टी बहाल करण्यात आली. पुढील मिनिटाला ही पेनल्टी छेत्रीने घेतली आणि नेटमध्ये मैदानालगत चेंडू अचूक मारताना बुदप्रोमला संधी अशी दिलीच नही. थायलंडने सहा मिनिटांनी बरोबरी साधली. यात बुनमाथन याने योगदान देत आधीच्या दुदैर्वी चुकीची काहीशी भरपाई केली. हालीचरण नझार्री याने चानाथीप सोंगक्रासीन याला ढकलले. त्यामुळे थायलंडला फ्री किक देण्यात आली. बुनमाथन याने डाव्या पायाने मारलेला फटका नेटसमोर गेला आणि त्यावर तिरासील डांग्डा याने अचूक हेडींग करीत भारतीय गोलरक्षक व कर्णधार गुरप्रीतसिंग संधू याला चकविले. भारताने दुसरय सत्राची सुरवात सनसनाटी केली. पहिल्याच आणि एकूण ४६ व्या मिनिटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली. त्याने बॉक्समध्ये आशिकला पास दिला. आशिकने छेत्रीच्या दिशेने चेंडूला मार्ग दिला. मग छेत्रीने पहिल्याच टचमध्ये लक्ष्य साधले.सुनील छेत्रीची कमालसुनील छेत्रीचा खाते उघडणारा गोल ह्यमाईलस्टोनह्ण ठरला. त्याने सध्या सक्रीय असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले. त्याचा हा ६६ वा गोल आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (६५ गोल) याला मागे टाकले. पोतुर्गालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो सर्वाधिक ८५ गोलांसह आघाडीवर आहे.गोल कुणीही नोंदवू द्या.. जल्लोष एकसारखाचसामन्यानंतर सुनील छेत्री म्हणाला की गोल कुणीही नोंदवला तर तो गोल नोंदवण्याचा आनंद आणि त्याचा जल्लोष हा एकसारखाच असतो. दहा वर्षांनंतर मी माज्या गोलबाबत विचार करु शकेल. गोल व्हायलाच हवेत. त्याची गरज आहे. गोल कोण करतो हे महत्वाचे नाही. तो कुणीही नोंदवला तरी त्याचा जल्लोष एकच असेल.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघFootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्री