भारताचा स्टार पारुपल्ली कश्यपची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:26 IST2017-07-21T01:26:33+5:302017-07-21T01:26:33+5:30

भारतीय स्टार पारुपल्ली कश्यप याने यूएस ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला कोरियाचा अव्वल मानांकित ली ह्यूने

India's star Parupalli Kashyap's winning salute | भारताचा स्टार पारुपल्ली कश्यपची विजयी सलामी

भारताचा स्टार पारुपल्ली कश्यपची विजयी सलामी

अनाहिम (अमेरिका) : भारतीय स्टार पारुपल्ली कश्यप याने यूएस ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला कोरियाचा अव्वल मानांकित ली ह्यून याच्यावर सनसनाटी विजय मिळविला आहे.
खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या कश्यपने जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या ली वर एक तास तीन मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१६, १०-२१, २१-१९ ने विजय नोंदविला. खांद्याच्या दुखापतीतून परतलेला दुसरा खेळाडू समीर वर्मा यानेदेखील व्हिएतनामचा हुआंग नाम याच्यावर २१-५, २१-१० नी विजय नोंदवित सकारात्मक सुरुवात केली. एच. एस. प्रणयदेखील दुसऱ्या फेरीत दाखल झाला. त्याने आॅस्ट्रियाचा लुका रेबर याचा २१-१२, २१-१६ ने पराभव केला. हर्षिल दाणीने मेक्सिकोचा अर्तरो हर्नांडेजवर २१-१३, २१-९ ने मात केली. रितुपर्णा दासने कॅनडाची राचेला हांड्रिच हिला २१-१६, २१-१८ ने, तर कृष्णप्रिया कुदरावल्लीने अमेरिकेची माया चेनला २१-१३, २१-१६ ने नमविले. सारंग लखानी, अभिषेक येलगार, साई उत्तेगजिता राव, रेश्मा कार्तिक व ऋत्त्विका गाडे यांना मात्र सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: India's star Parupalli Kashyap's winning salute